'लहानपणी जसा पोलिओचा डोस देतात तसा डोस तुला वेळेवर दिला गेला नाहीये' म्हणत महेश टिळेकरांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

mahesh tilekar on ketaki chitale
mahesh tilekar on ketaki chitale

मुंबई- स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने शिवरायांवर केलेल्या थट्टेमुळे शिवप्रेमींनी तिला चांगलंच सुनावलं आहे. मात्र यानंतर या प्रकरणात अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली आणि हा वाद स्वतःवर ओढवून घेतला. अभिनेत्री केतकी चितळे सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तसंच सोशल मिडियावर ती नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. असंच काही या प्रकरणातही पाहायला मिळालं आहे. केतकीने फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत शिवप्रेमींवर टीका केल्यानंतर दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 

तीन वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वयंघोषित मावळे महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरु करतात असं केतकीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. केतकीच्या या पोस्टनंतर नेटक-यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टिका केली होती. त्यानंतर महेश टिळेकर यांनी देखील केतकीला एक व्हिडिओ पोस्ट करुन चांगलंच सुनावलं आहे. 

काय म्हणाले महेश टिळेकर?

महेश यांनी व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलंय, 'केतकीने तिच्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय तसंच मावळ्यांचाही उल्लेख केला आहे. जेव्हा छत्रपतींचा उल्लेख होतो मावळ्यांचा उल्लेख होतो तेव्हा तु नक्की कोणाबद्दल बोलते हे न कळण्याइतकी मराठी जनता, शिवप्रेमी, शिवभक्त मुर्ख, दुधखुळे नाही आहेत, तुझ्यासारखे. तुला काय वाटतं तु जे काही कमेंट्स करते पोस्ट लिहिते त्यामुळे तुला नाव-प्रसिद्धी मिळते तर असं अजिबात नाहीये. लोकांच्या मनात तुझ्याबद्दल आदरांच स्थान नाहीये.ते आपल्या कृतीतून मिळवावं लागतं.

लहानपणी जसा पोलिओचा डोस देतात तसा डोस तुला वेळेवर दिला गेला नाहीये. म्हणून केवळ वयानं आणि शरिराने तुझी नुसती वाढ झाली आहे. पण मेंदूने आणि बुद्धीने तुझी अजिबात वाढ झालेली नाही. म्हणून तू दरवेळी अशी बेताल वक्तव्य करतेस.' महेश यांनी व्हिडिओच्या शेवटी असंही म्हटलंय की त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे तिची लेखी तक्रार केली आहे. 

इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ-

director mahesh tilekar slams ketaki chitale for controversial post about chhatrapati shivaji maharaj followers  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com