हा चिखल दागिन्यासारखा मिरवू.. हातात नांगर धरुन प्रवीण तरडे म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

director pravin tarde shared video about he farming

हा चिखल दागिन्यासारखा मिरवू.. हातात नांगर धरुन प्रवीण तरडे म्हणाले..

pravin tarde : लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. त्यामुळे 'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. त्यांचा आपल्या गावावर, शेतीवर विशेष प्रेम आहे. म्हणून ते वेळात वेळ काढून गावी जावून शेती करत असतात. आज चक्क त्यांनी नांगर धरून एक व्हिडिओ शेयर केला आहे. सोबत एक छान संदेशही दिला आहे.

प्रवीण तरडे यांनी या आधी अनेकडा शेतीत काम करतानाचे व्हिडिओ शेयर केले आहेत. कधी भात लावताना, तर कधी शेतात भटकंती करताना.. सध्या पाऊस जोरदार असल्याने सगळीकडे नांगरणी, पेरणी आणि शेतीच्या कामांना वेग आला आहे. प्रवीण तरडेही आता गावी जाऊन शेती करत आहेत. चक्क हातात नांगर धरून भात शेतीतून त्यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडीओत एक बैलजोडी घेऊन ते स्वत: शेतात राबताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गाणे बॅकग्राऊंडला ऐकायला मिळत आहे.

प्रवीण तरडे यांनी या व्हिडीओला कॅप्शनही अत्यंत सूचक दिले आहे. 'हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात.. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ...', असे प्रवीण तरडे म्हणतात. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक महत्वाचा संदेश दिला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत तर काहींनी आपल्या गावाकडच्या आठवणी सांगितल्या आहेत.

टॅग्स :pravin tarde