रस्त्यावर खड्डे ही मुंबईची परंपरा.. दिग्दर्शक समीर विद्वांस भडकला..

मुंबईच्या रस्त्यांची चाळण पाहून कलाकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
director sameer vidwans shared tweet on mumbai bad road
director sameer vidwans shared tweet on mumbai bad road sakal

Sameer vidwans : पावसाळा आला आणि मुंबईच्या खड्ड्यांचा आणि पाणी तुंबण्याचा विषय आला नाही असं अशक्यच. कित्येक वर्षे मुंबईतील हे प्रश्न कायम आहेत. दरवर्षी मुंबई महानगर पालिका यावर स्पष्टीकरण देते, काम केल्याचे तपशील ते पण समस्येवर तोडगा काही निघत नाही. खड्ड्यांवरून दरवर्षी मोठे राजकारण होते. विरोधक पालिकेवर जोरदार टीका करतात. पावसाळा सुरू होऊन चार दिवस झाले नाही तोवरच मुंबईच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. या समस्येवर आता कलाकारांकडून टिकेचा सूर उमटत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपला संपात व्यक्त केला होता. आता दिग्दर्शक समीर विद्वांस यानेही आपला अनुभव व्यक्त करत मुंबईच्या रस्त्याची दुरावस्था मांडली आहे.

(sameer vidwans on mumbai road)

(director sameer vidwans tweet on bad experience with pity road in mumbai)

समीर विद्वांस याने मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांवर नुकतंच एक ट्वीट केलं आहे. तो म्हणतो.. 'मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत. अर्थात हे काही नवीन नाही. रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वर्षानुवर्षे.. रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता ‘परंपरा’ मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!' अशा शब्दात त्याने सरकारचे लक्ष वेधले आहे.

समीर विद्वांस यांनी मुंबई महापालिका आणि सरकारला उद्देशून उपरोधिक भाष्य करत हे ट्विट केलं आहे. मुंबईतील रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास यावर तो बोलला आहे. त्याचे हे ट्विट सध्या बरेच चर्चेत आहेत. समीर हा मराठीतील एक दिग्गज दिग्दर्शक आहे. त्याने ‘धुराळा’, ‘आनंदी गोपाळ’ यांसारख्या मराठीतील सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय त्यांनी ‘समांतर २’साठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अलिकडेच त्यांना ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com