esakal | 'कशाची शिक्षा भोगतोय आपण?'; नाशिक दुर्घटनेवर दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप

बोलून बातमी शोधा

nashik oxygen leak
'कशाची शिक्षा भोगतोय आपण?'; नाशिक दुर्घटनेवर दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप
sakal_logo
By
स्वाती वेमूल

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी ऑक्सिजनच्या टाकीची गळती होऊन हाहाकार उडाला. ऑक्सिजन न मिळाल्याने २४ कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. 'नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना अंगावर शहारा आणणारी आहे. काय आणि कशाची शिक्षा आपण भोगतोय', असा सवाल दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केला आहे. समीर यांनी ट्विट करत दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

समीर विद्वांस यांचं ट्विट

'नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना अंगावर शहारा आणणारी आहे. काय आणि कशाची शिक्षा भोगतोय आपण आणि इतकी? आता बास! खरंच बास!,' असं ट्विट विद्वांस यांनी केलं.

घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी राज्य सरकार उच्चस्तरीय समिती नेमणार आहे. या समितीत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, अभियांत्रिकी तज्ज्ञ आणि वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश असेल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.