Disha Patani: आधी अभिनय शिक.. अ‍ॅब्स दाखवल्यामुळे दिशा पटानी झाली ट्रोल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disha Patani gets mercilessly trolled for flaunting her toned abs post workout session

Disha Patani: आधी अभिनय शिक.. अ‍ॅब्स दाखवल्यामुळे दिशा पटानी झाली ट्रोल..

Disha Patani: दिशा पटानी सध्या आपल्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे. रोज सोशल मीडियावर तिचे जिमिंग आणि नियमितपणे फिटनेसचे व्हिडिओ ती शेयर करत असते. पण आज दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला आणि चांगलीच ट्रोल झाली.

(Disha Patani gets mercilessly trolled for flaunting her toned abs post workout session)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: पुन्हा समृद्धीच कॅप्टन! घेतला असा निर्णय की सगळे बघतच राहिले..

दिशा पटानी अनेकदा तिच्या चाहत्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे किंवा व्हिडीओ व्दारे जिममध्ये जाण्यासाठी प्रेरित करत असते. तिच्या योगबद्दल चाहतेही तिचे कौतुक करत असतात. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये वर्कआउट सेशननंतर तिचे अॅब्स फ्लॉंट करताना दिसून येत आहे.

हेही वाचा: Alia Bhatt: कामाठीपुरातली गंगू अजूनही माझ्यात.. आलिया भट्ट काय म्हणाली बघाच

हा व्हिडिओ शेयर करून अॅब्स दाखवणं चांगलंच महागात पडलं आहे. प्रतिक्रिया देताना एका युजरने कमेंट केली आहे की, “सिक्स पॅक पूर्ण कधी होणार ”, तर दुसर्‍याने लिहिले, “यामध्ये माझा काय फायदा" एका युजर्स ने लिहिले “अभिनयाचे शिक्षण घे कधीतरी" दुसर्‍याने लिहिले, “काही येत नाही हिला फक्त फिटनेसचे व्हिडिओ शेअर करते आणि फॉलोअर्स वाढवत आहे ” तर एक म्हणतो" हिच्याकडे सध्या चित्रपट नाही तर हे काम करते" तर एक म्हणतो, 'याला फिटनेस नाही विकनेस म्हणतात' तिचा या व्हिडिओवरुन तिला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.