'ते चित्र अर्जेटिनातल्या कलाकाराचे नव्हे माझ्या भावाचे'; दिशा पटानी झाली ट्रोल

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 24 October 2020

दिशाच्या पोस्टनंतर तिच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली. तिने तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. 

मुंबई - आपण तयार केलेल्या एखाद्या कलाकृतीच्या निर्मिती विषयी वाद होणे तसे नवे नाही. कित्येकदा त्यांच्याविषयीचे वादाने लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री दिशा पटानीला अशाच प्रकारच्या एका वादाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे. तिच्या भावाने तयार केलेलं कॅरिकेचर चक्क अर्जेटिनातील व्यक्तिने आपण काढल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर त्याने ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यावरुन मात्र दिशाने त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.

सध्या दिशा पटानी मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे. दिशाने अर्जेटियन कलाकार इनहोसो याचे अॅनिमेशन चित्र सोशल मीडियावर शेयर केले आहे. आणि ते अॅनिमेशन आपला भाऊ सुर्यंशने केले असल्याचे म्हटले आहे. यामुळे तिला अनेकांनी याप्रकरणावरुन डिवचण्यास सुरुवात केली आहे. राधे या चित्रपटाची अभिनेत्री असलेल्या दिशाने एका आर्ट वर्कचा व्हिडिओ शेयर केला आहे. आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर 'Helltaker's Malina character' या नावाने शेयर केलेल्या त्या व्हिडिओच्या खाली तिने "#sketchbysuri my little bro’s art inspired by inhoso" अशा प्रकारची कॅप्शनही दिली आहे. त्यामुळे नक्की ते चित्र कुणाचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे दिशा ट्रोल झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#sketchbysuri my little bro’s art inspired by inhoso

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशाच्या पोस्टनंतर तिच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली. तिने तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला. यावर नेटक-यांनी तिला त्या इनहोंसोंचा वॉटरमार्क का काढला असेही विचारले आहे. मात्र यासगळ्यावर त्या मुळ कलाकाराने पोस्टमधून नवीन माहिती सांगितली आहे. तो म्हणतो, माझ्या कलाकृतीवर मला न सांगताच, न विचारता हक्क सांगण्यात आला. हे चुकीचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मी त्या व्यक्तीचा कुणीही भाऊ नाही. माझ्या त्या चित्रावरील वॉटरमार्कही काढण्यात आला आहे. आणि ते चित्र आपल्या भावाचे आहे असे सांगण्यात आले आहे. यासगळ्या प्रकाराला काय़ म्हणावे असा प्रश्न त्या संबंधित कलाकाराने आपल्या सोशल अकाऊंटवरुन विचारला आहे. यावर नेटक-यांनी दिशाला धारेवर धरले आहे. तिने ज्याठिकाणी आपल्या भावाच्या नावाचा उल्लेख केला आहे त्याठिकाणी मुळ कलाकाराचे नाव लिहिले आहे. 
  
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disha Patani shares Argentinian artists anime artwork