दिशाच्या मॉन्सून टिप्स 

भक्ती परब 
शुक्रवार, 14 जुलै 2017

उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंप्रमाणेच पावसाळ्यातही एक खास ब्युटी बॅग ठेवायला हवी, असं म्हणतेय चार्मिंग ब्युटी दिशा पटनी. तिचा फॅशनेबल अंदाज नेहमीच आपल्याला भावतो. दिशा म्हणते की तिला पाऊस खूप आवडतो.

उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंप्रमाणेच पावसाळ्यातही एक खास ब्युटी बॅग ठेवायला हवी, असं म्हणतेय चार्मिंग ब्युटी दिशा पटनी. तिचा फॅशनेबल अंदाज नेहमीच आपल्याला भावतो. दिशा म्हणते की तिला पाऊस खूप आवडतो.

त्यामुळे या ऋतूप्रमाणेच उल्हासित दिसण्यासाठी ती कलरफुल ड्रेसिंग स्टाईल ठेवते. ज्यामध्ये रंग उठावदार असतात. पुढे ती म्हणते, पावसाळा प्रिय आहेच; शिवाय पावसाळ्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आवडतात. पावसाळ्याच्या दिवसात माझ्या बॅगमध्ये एक मल्टिपर्पज क्रीम नियमित ठेवते. त्यामुळे मला एक परफेक्‍ट शायनी लूक मिळतो. मला निळ्या रंगाचे कपडे घालायला आवडतं आणि घरातून निघताना मी काजळ लावायला अजिबात विसरत नाही.

त्याचबरोबर ब्लॅक आय लायनर माझ्या बॅगमध्ये ठेवते. फिक्कट गुलाबी रंगाचं लिप ग्लॉस माझ्या मॉन्सून लूकसाठी परफेक्‍ट आहे. त्यामुळे तेही माझ्या ब्युटी बॅगमध्ये नेहमी असतंच. दिशाने नुकतीच एका प्रसिद्ध फॅशन ब्रॅंडसाठी जाहिरात केली. त्यानिमित्ताने तिने आपल्या या मॉन्सून लूकच्या टिप्स शेअर केल्या. 

Web Title: Dishas Monsoon Tips