दिव्यांकाने दयाबेनचा रोल करण्याबद्दल केला महत्त्वाचा खुलासा

दयाबेनच्या रोलसाठी दिव्यांकाच्या नावाची जोरदार चर्चा
दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठीदिव्यांका त्रिपाठी इन्स्टाग्राम

मुंबई: सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचं (Divyanka Tripathi) नाव सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मध्ये दिव्यांका दिसणार अशी चाहत्यांमध्ये चर्चा आहे. दिव्यांकाला 'तारक मेहता...' मालिकेत रोल ऑफर केल्याचं बोललं जातय. 'ये हैं मोहब्बते' आणि 'बनू मे तेरी दुल्हन' या दोन मालिकांमुळे दिव्यांकाला घराघरात ओळख मिळाली. (Divyanka Tripathi to play Dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashma Heres her response)

दयाबेनच्या भूमिकेसाठी दिव्यांकाशी संपर्क साधण्यात आल्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील दयाबेन हे सर्वाधिक लोकप्रिय पात्र आहे. जेठालाल आणि दयाबेनची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सुरुवातीपासून दिशा वाकानी हा रोल करत होती. तिने या रोलला एक वेगळं महत्त्व प्राप्त करुन दिलं.

दिव्यांका त्रिपाठी
मुंबई: कॉलेजचा ऑनलाईन वर्ग सुरु असताना लागला पॉर्न व्हिडीओ

एका दैनिकाशी बोलताना दिव्यांकाने या रोलबद्दल खुलासा केला आहे. "या सगळ्या अफवा आहेत. त्यात अजिबात तथ्य आणि सत्य नाहीय. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही एक चांगली मालिका असून त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मी या मालिकेत काम करण्याबद्दल फारशी गंभीर नाहीय. मी नवीन संकल्पना आणि नव्या आव्हानांचा विचार करतेय" असे दिव्यांका त्रिपाठीने स्पष्ट केले.

दिव्यांका त्रिपाठी
पोलिसात असलेल्या सूनेवर सासऱ्याने केला बलात्कार

तीन वर्षांपूर्वी दिशा वाकानी या शो मध्ये दयाबेन म्हणून शेवटच्या दिसल्या होत्या. २०१७ मध्ये दिशा मातृत्वासाठी रजेवर गेल्या. त्यानंतर त्या मालिकेत परतल्यात नाहीत. दयाबेन पुन्हा परतणार म्हणून चर्चा होती. पण या बद्दल अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दिव्यांका नुकतीच दक्षिण आफ्रिका केपटाऊनमधून परतली. 'खतरो के खिलाडी ११' च्या शूटसाठी दिव्यांका तिथे गेली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com