ब्राओ म्हणतोय ट्रीप अभी बाकी है... 

संकलन : भक्ती परब  
सोमवार, 17 एप्रिल 2017

डीजे ब्राओचं हिंदी रॅप "ट्रीप अभी बाकी है...' ऐकलं का? काय सांगता अजून नाही. मग ऐकाच एकदा. या गाण्यातील ब्राओचा देसी अवतार पाहून तुम्ही थक्क व्हाल. झी म्युझिक कंपनीने नुकताच या हिंदी रॅप गाण्याचा व्हिडीओ यू ट्युबर अपलोड केला. या व्हिडीओला 40 लाखांच्यावर व्हूज मिळाले आहेत. "शिवी' या नावाने लोकप्रिय असलेल्या शिवरंजनी सिंग हिने हे गाणं लिहिलंय, त्याला संगीत दिलंय आणि डीजे ब्राओसोबत ती स्वतः गायलीही आहे. 

या गाण्यामध्ये हिंदी शब्दांचं उच्चारण ब्राओने अतिशय छान केलंय म्हणून त्याचं सगळीकडे कौतुक होतंय. त्रिनीदादचा क्रिकेटर आणि गायक असलेल्या डॅन ब्राओने त्याच्या चॅम्पियन गाण्याने सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं आणि आता तो "ट्रीप अभी बाकी है' हे रॅप गाणं गात पुन्हा भारतीयांची मनं जिंकतोय. या गाण्यामध्ये त्याचा लूक फारच क्‍युट आहे. अगदी मस्त कुठलाही कृत्रिम भाव चेहऱ्यावर न ठेवता तो गायला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना आपणही ब्राओ इतकाच आनंद लुटतो. 

Web Title: DJ bravo says ''Trip abhi baki hai ''

व्हिडीओ गॅलरी