esakal | वेडिंग फोटोशूटमध्ये कुत्र्याची नुसती हवा
sakal

बोलून बातमी शोधा

वेडिंग फोटोशूटमध्ये कुत्र्याची नुसती हवा

वेडिंग फोटोशूटमध्ये कुत्र्याची नुसती हवा

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या तर अशा फोटो आणि व्हिडिओला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. यु ट्युबवर त्यांना लाखो, कोट्यवधी लाईक्स आणि व्ह्युजही मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नव्या वधु - वराचं फोटोसेशन सुरु होतं, अचानक त्याचवेळी एका कुत्र्यानं त्याठिकाणी इंट्री केली. बराचकाळ त्यांना फोटो काढण्यासाठी वाट पाहावी लागली. सोशल मीडियावर एकानं हा फोटो पोस्ट केला आहे. त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाली आहे. कित्येकांनी त्या कुत्र्याच्या एक्सप्रेशनचे कौतूकही केले आहे.

लग्न सुरु होतं तेव्हाही त्यानं असाच त्रास दिला होता. त्यावेळी उपस्थितांनी कुत्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. न बोलावता आलेल्या या अनोख्या पाहूण्यांनी वधू वराला चांगलच हैराण केलं होतं. त्या कुत्र्याचे नाव हेन्री असे आहे. त्यानं त्या फोटोला जे एक्सप्रेशन्स दिले त्याला तोड नव्हती. त्या फोटोला सध्या मोठ्या प्रमाणवर प्रतिसाद मिळतो आहे. हा फोटो अमेरिकेतील आहे. त्या देशात राहणाऱ्या एमिली बॅरिअरनं आपल्या पार्टनरसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी त्यांचा कुत्रा हेन्री देखील त्यावेळी उपस्थित होता. मात्र तो त्यावेळी भलताच खुश झाला. त्यालाही त्याचे फोटो काढण्याचा मोह काही आवरेना. या कारणामुळे एमिलीला स्वतंत्र फोटो काढण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली.

आपल्यापैकी कुणाच्या घरात पाळीव प्राणी असल्यास काय प्रकारचे दिव्य करावे लागतात हे त्यांना चांगलेच माहिती आहे. प्राण्यांना हाताळणं, त्यांची समजूत घालणं मोठं जिकिरीचं काम आहे. पाळीव प्राण्यांना आपल्या मालकांविषयी भलतचं प्रेम असतं. मात्र हे प्रेम कधी इतकं उतू जातं की त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि अमेरिकेतील त्या प्रसंगावरुन हे दिसुन आले आहे. नवविवाहित दाम्पत्याला फोटो काढू न देण्यासाठी शक्य तितके प्रयत्न कुत्र्यानं केले आहेत. त्या जोडीनं फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला सांगितलं खरं, पण त्याला ते काही शक्य झालं नाही. सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हेही वाचा: विकी कौशल-कतरिना कैफने गुपचूप उरकला साखरपुडा?

हेही वाचा: Video: 'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; पत्रकारांना शिल्पा शेट्टीचा प्रतिप्रश्न

loading image
go to top