Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Double XL Trailer

Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

Sonakshi Huma Film Trailer: खरंतर हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचे कौतूक करायला हवे की, त्यांनी डबल एक्स एल नावाचा चित्रपट करण्याची तयारी दर्शवली. जेव्हा या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता त्यावेळी त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडच्या दोन्ही स्टार अभिनेत्री या चित्रपटामध्ये आपल्या वेगळ्या भूमिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर व्हायरल झाला असून त्यावर आलेल्या कमेंट भन्नाट आहे.

बॉलीवूडमध्येच नव्हे तर जवळपास बऱ्याच क्षेत्रांमध्ये बॉडी शेमिंग नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. बॉडी शेमिंगला मोठमोठ्या अभिनेत्रींना सामोरं जावं लागलं आहे. त्याचा त्यांच्यावर झालेल्या परिणामाविषयी त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतीतून सांगितलं आहे. डबल एक्स एल या चित्रपटामध्ये याच विषयावर भाष्य करण्यात आले आहे. टीझरला मिळालेल्या प्रतिसादावरून आता ट्रेलरही नेटकऱ्यांचा कुतूहलाचा विषय होता. त्यालाही चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

डबल एक्स एल हा प्रभावीपणे बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करणारा असेल असे त्या ट्रेलरमध्ये दिसून आले आहे. ट्रेलरमध्ये दोन जास्त वजनाच्या युवती आहेत. त्यांना काही करुन आपआपल्या क्षेत्रात मोठं यश संपादन करायचे आहे. मात्र त्यांचे वाढणारे वजन आणि त्यावरुन त्यांच्यावर होणारी टीका याचा परिणाम त्यांच्यावर होतो आहे. यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय, पुरुषीपणावर केलेली टीका, आजच्या युवकांना काय हवे आहे, त्यांची मानसिकता यावर प्रभावीपणे डबल एक्स एल भाष्य़ करताना दिसतो आहे.

हेही वाचा: Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका

डबल एक्स एल हा एक कॉमेडी चित्रपट असून तो 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनातून प्रेक्षकांचे प्रबोधन व्हावे अशा हेतूनं या विषयाची मांडणी करण्यात आल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक सतराम रामानी यांनी केले असून या चित्रपटामध्ये भारतीय संघाचा प्रसिद्ध फलंदाज शिखर धवनही प्रेक्षकांना दिसणार आहे.

हेही वाचा: Kiara Advani: 'ये जो हलका हलका सुरुर है...' कियारा 'ट्रान्सपरंट' साडीत!