Dr.Amol Kolhe: 'तर मी माझ्या राजकीय पदाचा त्याग करेन...', डॉ.अमोल कोल्हे स्पष्टच बोललेDr.Amol Kolhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DR. Amol Kolhe shivpratap Garudjhep movie,podcast interview

Dr.Amol Kolhe: 'तर मी माझ्या राजकीय पदाचा त्याग करेन...', डॉ.अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

DR. Amol Kolhe Podcast: अनेक ऐतहासिक भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा 'शिवप्रताप गरुडझेप' या त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होतानाचा थरार आपल्याला या सिनेमात अनुभवता येणार आहे.

अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता म्हणून आपल्याला माहीत नाहीत तर एक राजकीय नेता म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची एक वेगळी ओळख आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या निमित्तानं ईसकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारण आणि मनोरंजन यावर दिलखुलास संवाद साधला आहे. अमोल कोल्हे यांनी या मुलाखतीत राजकारणातही मनोरंजन शिरतंय या प्रश्नावर नेमक्या कोणाच्या कानपिचक्या घेतल्या आहेत हे ऐकण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांची बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

डॉ. अमोल कोल्हे यांनी याच मुलाखतीत राजकारण आणि मनोरंजन याचा सुरेख मेळ साधत काही थेट वक्तव्य केली आहेत. सध्या राजकारणातच खूप मनोरंजन घडतंय तेव्हा ते सिनेसृष्टीला किती घातक या प्रश्नावर तर डॉ.अमोल कोल्हे यांनी काही थेट वक्तव्य करत राजकीय नेत्यांसोबतच राजकीय वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांना देखील धारेवर धरलं आहे. याच मुलाखतीत राजकीय पदाचा त्याग करण्याविषयी देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते असं का म्हणाले आहे ते पॉडकास्ट ऐकल्यावर कळेलच आपल्याला. डॉ.अमोल कोल्हे यांची ही बेधडक मुलाखत ऐकण्यासाठी बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

हेही वाचा: Adipurush चा दिग्दर्शक ओम राऊत अक्षयच्या 'रामसेतू'वर स्पष्टच बोलला ; म्हणाला,'यात जे दाखवलंय ते...'

डॉ. अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या भूमिका अनेक वेळा केल्या आहेत. छत्रपती संभाजी राजेही त्यांनी साकारले आहे. ऐतिहासिक भूमिकांची त्यांच्यावर एक विशेष छाप आहे. मग अशा वेळेला शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले कोणते गुण कोल्हेंनी आत्मसात केलेयत आणि त्याचा वापर ते राजकारणात करतात? या प्रश्नावर उत्तर देताना कोल्हेंनी मारलेला सिक्सर या पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून नक्की ऐका. पॉडकास्ट मुलाखतीची लिंक वर बातमीत जोडलेली आहे.