'३५६ वर्षांपूर्वी हाच आग्र्याचा लाल किल्ला..', 'शिवप्रताप गरुडझेप' नवा टिझर

डॉ.अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमा सप्टेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.
Dr. Amol Kolhe's 'Shivpratap GarudJhep' New Teaser Release
Dr. Amol Kolhe's 'Shivpratap GarudJhep' New Teaser ReleaseGoogle

रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या(Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे(Dr. Amol Kolhe) यांचा 'शिवप्रताप गरुडझेप'(Shivpratap Garudjhep) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा 'टिझर' नुकताच प्रदर्शित झाला आहे.(Dr. Amol Kolhe's 'Shivpratap GarudJhep' New Teaser Release)

राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. कोल्हे यांचंच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dr. Amol Kolhe's 'Shivpratap GarudJhep' New Teaser Release
Hruta Durgule ला चाहत्याचं सरप्राईज,'अनन्या' लिहिलेली अनोखी अंगठी दिली भेट

या चित्रपटाचा 'टिझर' प्रदर्शित झाला असून या भव्यदिव्य चित्रपटाची झलक व धारदार संवादाची प्रचिती दिसून येते. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच त्यांचे चातुर्य, शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.

Dr. Amol Kolhe's 'Shivpratap GarudJhep' New Teaser Release
'आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य?', डॉ.अमोल कोल्हे पोस्ट चर्चेत

'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com