Dream Girl 2: पुजा मारतेय परीवर लाईन.. आयुष्मान - अनन्याच्या ड्रीम गर्ल 2 चं नवीन हटके पोस्टर लॉंच

आयुष्मान खुराना- अनन्या पांडेच्या ड्रीम गर्ल 2 चं नवीन पोस्टर लॉंच झालंय
dream girl 2 ayushmann khurrana and ananya pande new poster release date trailer
dream girl 2 ayushmann khurrana and ananya pande new poster release date trailer SAKAL

Dream Girl 2 News: आयुष्मान खुरानाच्या आगामी ड्रीम गर्ल 2 ची उत्सुकता शिगेला आहे. आयुष्मान गेले काही महिने ड्रीम गर्ल 2 चं हटके प्रमोशन करत आहे. अगदी सलमान खान, रणवीर सिंग अशा अनेक बड्या अभिनेत्यांचे आवाज ड्रीम गर्ल 2 च्या छोट्या छोट्या टीझरमध्ये दिसले.

ड्रीम गर्ल 2 च्या माध्यमातुन आयुष्मान पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या पुजा या भुमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ड्रीम गर्ल 2 मधील परी म्हणजेच अभिनेत्री अनन्या पांडेचा लुक समोर आलाय

(dream girl 2 ayushmann khurrana and ananya pande new poster)

dream girl 2 ayushmann khurrana and ananya pande new poster release date trailer
Gashmeer Mahajani: वडीलांच्या मृत्यूनंतर मराठी कलाकरांनी सपोर्ट केला का? गश्मीर म्हणतोय, 'फक्त समजूतदार लोकच..'

कोण आहे पुजाची परी?

ड्रीम गर्ल 2 च्या सीक्वेलची घोषणा झाल्यापासुनच चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता आहे. अशातच सिनेमातील "परी" ची झलक दाखवणारं एक आकर्षक नवीन पोस्टर आज लॉंच करण्याच आलंय. परीच्या भुमिकेत अनन्या पांडे अत्यंत आकर्षक दिसतेय.

ही आहे परी, माझी ड्रीम गर्ल अशी ओळख करुन देत अनन्या पांडेचा सिनेमातील लुक रिव्हील करण्यात आलीय.

"परी" ची व्यक्तिरेखा साकारणारी अनन्या तिच्या मोहक अंदाजाने प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहे. अनन्या आणि आयुष्मानच्या जोडीच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

नवीन पोस्टरमध्ये काय?

पोस्टरमध्ये पहायला मिळतं, अनन्या हाताची घडी घालुन शांतपणे उभी आहे. अशातच पडद्याबाहेर येऊन आयुष्मान अनन्याला डोळा मारतोय.

तर पडद्याआड आयुष्मान स्त्रीच्या पेहरावात दिसतोय. हटके पोस्टर असलेला आयुष्मान आणि अनन्याचा ड्रीम गर्ल 2 सिनेमा आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय.

dream girl 2 ayushmann khurrana and ananya pande new poster release date trailer
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: मराठमोळ्या क्षिती जोगचं दिग्दर्शक करण जोहरने केलं कौतुक, म्हणाला..

ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेट

काही दिवसांपुर्वी आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' मधील फर्स्ट लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला. आयुष्मानचा लुक सुद्धा सर्वांना आवडला. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातुन हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करणार आहेत.

2019 मध्ये आलेल्या आयुष्मानच्या हिट सिनेमा 'ड्रीम गर्ल'चा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर आयुष्यमान आणि अन्यनासोबत यात अन्नू कपूर, परेश रावल, सीमा पाहवा, विजय राज, मनोज जोशी, राजपाल यादव आणि असरानी यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होइल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com