Dream Girl 2: अरेच्चा! ड्रीम गर्ल 2 प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात, मेकर्स विरोधात कायदेशीर नोटीस

ड्रीम गर्ल 2 च्या मेकर्सना कायदेशीर नोटीस आलीय. बघा काय आहे प्रकरण, जाणुन घ्या
dream girl 2 writer naresh kathooria legal notice against ayushmann khurrana ananya pande
dream girl 2 writer naresh kathooria legal notice against ayushmann khurrana ananya pande SAKAL

Dream Giral 2 News: आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' ची उत्सुकता आहे. काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा ट्रेलर एकमेकांच्या भेटीला आला. ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली. आयुष्मान ड्रीम गर्ल 2 मधुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

पण ड्रीम गर्ल 2 रिलीज आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. ड्रीम गर्ल 2 च्या मेकर्सना कायदेशीर नोटीस आलीय. काय आहे प्रकरण, जाणुन घ्या

(dream girl 2 writer naresh kathooria legal notice against ayushmann khurrana ananya pande)

dream girl 2 writer naresh kathooria legal notice against ayushmann khurrana ananya pande
Prasad - Amruta: प्रसाद - अमृताच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम, पण किचनमध्ये घडलं भलतंच, व्हिडीओ व्हायरल

या माणसाने पाठवली कायदेशीर नोटीस

ड्रीम गर्ल 2 चा लेखक नरेश कथुरिया यांनी 'ड्रीम गर्ल 2'च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्रेलरच्या क्रेडिट स्लेटमध्ये नरेश कथुरिया यांचं नाव नसणे, हे त्यामागचे कारण आहे.

नोटीसनुसार, नरेश यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. याच पटकथेवर आधारीत ड्रीम गर्ल 2 जी सिनेमाची निर्मिती थिंकिंग पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स, पेन मरुधर सिने एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि झी सिनेमा यांनी संयुक्तपणे केली आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, लेखक करारानुसार, निर्माते आणि नरेश यांनी ठरवले होते की क्रेडिट स्लेटमध्ये त्याचे नाव नमूद केले जाईल. त्यांचं नाव सर्व प्रिंट मीडिया, ट्रेलर आणि सर्व प्रमोशनल अॅक्टीव्हीटीमध्ये समाविष्ट असेल, असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं.

प्रमोशनमध्ये नाव वगळल्याने लेखकांनी पाठवली नोटीस

नरेश कथुरिया म्हणतात की, निर्मात्यांना ट्रेलरच्या स्टोरी क्रेडिट विभागात दिग्दर्शक राज शांडील्य यांचे नाव जोडायचे होते.

दिग्दर्शकाची मुळ कथा नसल्यामुळे सर्वांची दिशाभूल होईल असं कारण देऊन नरेश कथुरिया यांंचं नाव वगळण्यात आले. हा लेखक म्हणुन कथुरियाला मोठा धक्का होता.

इतकेच नाही तर ट्रेलरमध्ये राजच्या नावासोबत त्यांचे नावही बदलण्यात आले आहे. तसेच यूट्यूबवरील ट्रेलरच्या खाली व्हिडिओ Description मध्ये कथुरिया यांना क्रेडिट दिले गेले नाही. म्हणुन नरेश कथुरिया यांनी ड्रीम गर्ल 2 च्या मेकर्सना नोटीस पाठवलीय.

dream girl 2 writer naresh kathooria legal notice against ayushmann khurrana ananya pande
Rinku Rajguru: डोळ्यात पाणी, शब्द नाही.. आयुष्यातील पहिलं नाटक पाहिल्यावर रिंकुने व्यक्त केल्या भावना

ड्रीम गर्ल 2 ची रिलीज डेट

ड्रीम गर्ल 2 चा ट्रेलर मिलियनच्या पार व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट 2019 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ड्रीम गर्लचा सिक्वेल आहे. एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी चित्रपटाती निर्मिती केली तर राज शांडिल्य दिग्दर्शिन केलं आहे.

आयुष्मान खुरानाची प्रमुख भुमिका असुन अनन्या पांडे, परेश रावल, अन्नु कपूर यांची प्रमुख भुमिका असलेला हा सिनेमा 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com