esakal | मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज

मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता सुमित राघवन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट तो चाहत्यांसोबत शेअर करतो. सुमितने नुकतच मुंबईच्या रस्त्यांवर भाष्य करणारे ट्विट शेअर केले. यामध्ये सुमितने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काही परदेशातील लोक रस्त्यावर स्पिडमध्ये सायकल चालवताना दिसत आहेत. या व्हिडीओला सुमितने कॅप्शन दिले, 'मंबईच्या रस्त्यावर अशी गाडी चालवा मग मी तुम्हाला मानेल.' सुमितने कॅप्शनमध्ये 'माय बीएमसी' या मुंबई महानगरपालिकतेच्या अकांऊटला टॅग करून लिहीले, 'काय म्हणता? देऊया का चॅलेंज या परदेशातील लोकांना. 76% खड्डे कमी झाले म्हणे.' (Drive on the streets of Mumbai Sumit Raghavan challenge share tweet )

सुमितच्या या ट्विटला अनेकांनी कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'सुमित दादा असल काही टॅग करून टाकायचं नाही बर का.. म्हणे ऑफिस ऑफिस खेळतात नंतर मा. अधिकारी' , तर दुसऱ्याने कमेंट केली 'जर त्यांनी असे मुंबईच्या रस्त्यांवर केले तर या खेळची 'Extreme Adventure Sports' मध्ये गणती होईल'

हेही वाचा: 'वाघाचं काळीज पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर अमृताचे उत्तर

'साराभाई vs साराभाई' आणि 'सजन रे झुठ मत बोलो' या मालिकेतील सुमितच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच तो 'वागले की दुनिया' या हिंदी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा: हेमांगीच्या अंतर्वस्त्रावरील पोस्टवर तृप्ती देसाईंचा सवाल

loading image