'ई सकाळ'च्या 'या' मैफलीचा आनंद घेतला 40 हजारांवर प्रेक्षकांनी

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ई सकाळने खास मैफलीचं आयोजन केलं होतं. खरंतर त्याची सुरूवात झाली ती लाईव्ह गप्पांमधून पण उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या गप्पांचं मैफलीत रुपांतर झालं आणि हा लाईव्ह चॅट शो तब्बल सव्वा तास चालला. गीतकार वैभव जोशी, गीतकार संदीप खरे आणि अभिनेत्री, कवियित्री स्पृृहा जोशी या तिघांनी या मैफलीत भाग घेतला. ईर्शाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही मंडळी एकत्र आली होती. पुण्यासह मुंबई, नाशिक, दिल्ली, दुबई, लंडन, स्वीत्झर्लंड येथील साहित्यप्रेमींनी या मैफीलचा आस्वाद घेतला. इतकंच नव्हे, एेन दिवाळीत या मैफलीचे व्ह्यूअर्स वाढून त्यांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला. 

पुणे : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ई सकाळने खास मैफलीचं आयोजन केलं होतं. खरंतर त्याची सुरूवात झाली ती लाईव्ह गप्पांमधून पण उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या गप्पांचं मैफलीत रुपांतर झालं आणि हा लाईव्ह चॅट शो तब्बल सव्वा तास चालला. गीतकार वैभव जोशी, गीतकार संदीप खरे आणि अभिनेत्री, कवियित्री स्पृृहा जोशी या तिघांनी या मैफलीत भाग घेतला. ईर्शाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही मंडळी एकत्र आली होती. पुण्यासह मुंबई, नाशिक, दिल्ली, दुबई, लंडन, स्वीत्झर्लंड येथील साहित्यप्रेमींनी या मैफीलचा आस्वाद घेतला. इतकंच नव्हे, एेन दिवाळीत या मैफलीचे व्ह्यूअर्स वाढून त्यांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला. 

ई सकाळची लाईव्ह मैफल.. एेका आणि आनंद घ्या 

इर्शाद या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेल्या या तिघांनी कवितेबद्दल गप्पा मारल्या. पण काही कविता सादरही केल्या. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो डोह, चाफ्याच्या झाडा यांचा. याच कार्यक्रमात संदीप खरे यांनी आपल्याला सुचलेली एकदम नवी कोरी कविता चाहत्यांना एेकवली. केवळ आपल्याच नव्हेत तर इतर कविंच्या कवितांचा उल्लेखही या कार्यक्रमात झाला. काहींनी या कवितांचं सादरीकरण केलं. अनेक प्रेक्षकांनी या लाईव्ह चॅटमध्ये भाग घेत ही दिवाळी अप्रतिम असल्याचं सांगितल. ई सकाळने सुरू केलेल्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केलं. आॅनलाईन प्रेक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना वैभव, संदीप आणि स्पृहा यांनी उत्तरं दिली. 

धनत्रयोदिवशी झालेल्या या लाईव्ह गप्पांमध्ये जवळपास 15 हजार प्रेक्षक सहभागी झाले. त्यानंतर या मैफलीचे शेअर वाढले आणि दिवाळीच्या दोन दिवसांत या मैफलीने 30 हजार व्ह्यूअर्सचा टप्पा ओलांडला, तर भाऊबीजेदिवशी हा आकडा 40 हजारापार गेला. थेट कवींच्या तोंडून त्यांच्या कविता एेकण्याची ही सुवर्णसंधी अनेकांनी साधली. पैकी काहींना लाईव्ह चॅटमध्ये भाग घेता न आल्याने त्यांनी नंतर ही मैफल पाहिली. केवळ कविता सादरीकरण नव्हे, तर ई सकाळचा हा उपक्रम लाईव्ह असल्याने या गप्पांमध्ये अनेक किस्से आले. अनेक अनुभव शेअर झाले. प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलता बोलता अनेक नव्या मुद्द्यांना स्पर्श केला गेला. आजवर कविंच्या उपस्थितीत असा लाईव्ह शो पहिल्यांदाच झाला. त्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर असे उपक्रम वारंवार करण्याचा आग्रह ई सकाळच्या प्रेक्षकांनी धरला आहे. 

Web Title: e sakaal maifal irshaad diwali spacial spruha joshi sandeep khare vaibhav joshi by soumitra pote