दिल्लीमध्ये सोनम कपूरसोबत 'या' सेलिब्रिटींना जाणवले भुकंपाचे धक्के

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

दिल्लीमधील भूकंपाने शुक्रवारी अनेकजणांना मनात भिती निर्माण केली. शुक्रवारी दिल्लीसोबत उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये ४.६ एवढ्या तीव्रतेचा भूकंप जाणवला.

मुंबई- सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यातंच टोळधाडीमुळे अनेकजण चिंतेत आहेत. असं असतानाच नुकतंच दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे २०२० हे वर्ष अनेक आव्हानांनी भरलेलं आहे असंच दिसतंय. कोरोना व्हायरस, अम्फान तुफान सारखी अनेक जागतिक संकटं यावर्षी एकत्र आली आहेत. त्यातंच दिल्लीमधील भूकंपाने शुक्रवारी अनेकजणांना मनात भिती निर्माण केली. शुक्रवारी दिल्लीसोबत उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये ४.६ एवढ्या तीव्रतेचा भूकंप जाणवला.

हे ही वाचा: भाऊ असावा तर असा... अक्षय कुमारने बहिणीला कोरोनापासुन वाचवण्यासाठी केलं संपूर्ण विमानच बूक

बॉलीवूड सेलिब्रिटी सोनम कपूर, हिमांश कोहली, अनुभव सिन्हा, मीरा चोप्रा, विवेक ऑबेरॉय आणि दिल्लीतील अनेक लोकांना भूकंपाचे हे धक्के जाणवले. १० सेकंद जमीन थरथरत असल्याचं यादरम्यान अनेकांना जाणवलं.

अभिनेत्री सोनम कपूरने ट्वीटवरुन याची माहिती देत लिहिलंय, दिल्लीमध्ये आत्ता भूकंप झाला.

तर दुसरीकडे 'थप्पड' आणि 'आर्टिकल १५' चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत म्हटलंय, 'खरंच आपण फॅसिझम कसं काय विचारु शकतो? प्रत्येकजण भूकंप विचारत आहे का? होय. भूकंप, सुरक्षित रहा. दिल्ली, तुम्हाला हिंमत देतोय.'

'हमसे है लाईफ' शो फेम अभिनेता हिमांश कोहलीने देखील भूकंपावर ट्वीट केलंय. त्याने लिहिलंय, 'इतरही कोणाला दिल्ली, एनसीआर मधील भूकंपाचे धक्के जाणवले का?' हिमांश काही दिवसांपूर्वीच विमानप्रवासाने मुंबईहून दिल्लीमध्ये आला होता. 

याव्यतिरिक्त टीव्ही अभिनेत्री अर्चना विजय हिने ट्वीट करत लिहिलं, 'काही मिनिटांपूर्वी कोणा कोणाला भूकंपाचे झटके जाणवले. असंच सांगा की ही केवळ कल्पना आहे.'

हिंदी, तमिळ आणि तेलुगु सिनेमामध्ये जम बसवलेल्या अभिनेत्री मीरा चोप्राने दिल्लीत आलेल्या भूकंपावर चिंता व्यक्त केली आहे. या एका महिन्यात दिल्लीमधील हा तिसरा भूकंप आहे. मीराने ट्वीटवर लिहिलंय, 'दिल्लीत भूकंप, ही एका महिन्यातील तिसरी वेळ आहे.'

earthquake in delhi sonam kapoor himansh kohli feel the tremors  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: earthquake in delhi sonam kapoor himansh kohli feel the tremors