पंतप्रधान मोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन अडचणीत

वृत्तसंस्था
Wednesday, 27 March 2019

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचे नुकतेच गाणे प्रदरिशित करण्यात आले. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने मंगळवारी नोटीस पाठवली आहे. देशात सध्या आचारसंहिता लागू असताना सध्याच्या राजकीय व्यक्तीच्या जीवनावर हा चित्रपट असल्याने त्यावर काँग्रेससहित इतर काही राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, देशात पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. विरोधीपक्षांची मागणी आहे की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निवडणुका पार पडेपर्यंत पुढे ढकलण्यात यावी. कारण, निवडणुकीत प्रचारासाठीच हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोप इतर पक्ष करत आहेत. त्यामुळे याचे प्रदर्शन थांबवण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती अॅड गुरु दिलीप यांनी सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाच्या कक्षेत बायोपिक येत नसल्याते म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EC Sends Notice to Makers of PM Narendra Modi Opposition Pushes for Ban