Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या अडचणीत वाढ, ईडीकडून आरोपपत्र दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jacqueline fernandez

Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या अडचणीत वाढ, ईडीकडून आरोपपत्र दाखल

Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, या आरोपपत्रात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. ईडीच्यावतीने दिल्ली न्यायालयात पीएमएलए अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिनची सुमारे 7 कोटी 12 लाखांची एफडी जप्त केली होती. आरोपी म्हणून जॅकलिनचे नाव आल्याने आता तिच्या अडचणीत वाढ झाली असून, या प्रकरणी ईडीकडून जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं ईडीला आढळून आलं होतं. त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.

Web Title: Ed Names Jacqueline Fernandez As Accused In Rs 215 Crore Extortion Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jacqueline Fernandez