Akshaya Deodhar : 'राणादा अन् पाठकबाई' एकनाथ शिंदेच्या गटात, अन्य मराठी कलाकारही करणार प्रवेश

राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या धक्कादायक घडामोडी घडत असताना अनेकांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Eknath Shinde CM Shivsena Akshaya Deodhar Actress
Eknath Shinde CM Shivsena Akshaya Deodhar Actress esakal

Eknath Shinde CM Shivsena Akshaya Deodhar Actress : राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या धक्कादायक घडामोडी घडत असताना अनेकांचा मोठा गोंधळ उडाला आहे. आता तर वेगळ्याच प्रकारच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना नवल वाटले आहे.

अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी देखील वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये अजित पवार हे आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री असतील असे भाष्य केले होते. ज्या गोष्टी काही दिवसांपूर्वीच घडणार होत्या त्या आता होत आहेत. त्यात काही विशेष नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात मात्र पक्षप्रवेश करणाऱ्या नवनवीन नेत्यांची दररोज भर पडते आहे. आज मनसेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. तसेच ठाकरे गटाचे विलास पारकर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासगळ्यात चर्चा रंगली आहे ती मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची.

Eknath Shinde CM Shivsena Akshaya Deodhar Actress
Eknath Shinde CM Shivsena Akshaya Deodhar Actress

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर अर्थात पाठक बाई या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय हार्दिक जोशी, अभिनेत्री अदिती सारंगधर, आणि माधव देवचाके यांच्या प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com