एकताच्या पंजाबी चित्रपटात दलजीत दोसांझ 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमार, पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा यांनी पंजाबी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शिका व निर्माती एकता कपूर "सुपर सिंह' नावाच्या पंजाबी चित्रपटाची निर्मिती करतेय. या चित्रपटात "उडता पंजाब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेते अनुराग सिंग करणार आहेत. अनुराग सिंग आणि दलजीत दोसांझ यांनी यापूर्वी "पंजाब 1984' आणि "जाट ऍण्ड ज्युलिएट' सीरिजमध्ये काम केलेलं आहे.

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षयकुमार, पिग्गी चॉप्स अर्थात प्रियंका चोप्रा यांनी पंजाबी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर आता दिग्दर्शिका व निर्माती एकता कपूर "सुपर सिंह' नावाच्या पंजाबी चित्रपटाची निर्मिती करतेय. या चित्रपटात "उडता पंजाब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारविजेते अनुराग सिंग करणार आहेत. अनुराग सिंग आणि दलजीत दोसांझ यांनी यापूर्वी "पंजाब 1984' आणि "जाट ऍण्ड ज्युलिएट' सीरिजमध्ये काम केलेलं आहे. अभिनेता दलजीत म्हणाला, माझं स्वप्न आहे, की पंजाबच्या प्रेक्षकांना त्यांचा सुपरहिरो देऊ शकेन आणि आता माझं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वात खास बाब म्हणजे माझे आवडते दिग्दर्शक अनुराग सिंग "सुपर सिंह'चं दिग्दर्शन करणार आहेत. त्याचबरोबर दलजीत लवकरच अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत "फिल्लोरी' चित्रपटात दिसणार आहे. 

Web Title: Ekta Kapoor & Diljit Dosanjh new punjabi movie