Mukesh Khanna : तू सासू-सुनेचे शो बनवून....; मुकेश खन्ना पुन्हा एकता कपूरवर संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Khanna Latest News

Mukesh Khanna : तू सासू-सुनेचे शो बनवून....; मुकेश खन्ना पुन्हा एकता कपूरवर संतापले

Mukesh Khanna Latest News एक काळ असा होता की टेलिव्हिजनवर शक्तिमान, रामायण, महाभारत सारखे कार्यक्रम यायचे. यानंतर एक काळ असा आला की टीव्हीवर सासू-सुनेच्या मालिका दाखवली जायची. सासू-सुनेच्या मालिकांच्या जमान्यात शक्तिमान, रामायण, महाभारत कुठेतरी हरवून गेले. सासू-सुनेच्या शोबद्दल वेळोवेळी लोक आपली मतं मांडत असतात. त्याचवेळी अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीही या शोबाबत एकता कपूरवर संताप व्यक्त केला आहे.

टेलिव्हिजन सुपरहिरो शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना बिंदास बोलण्यासाठी ओळखले जातात. मुकेश खन्ना जेव्हाही कोणत्याही विषयावर बोलतात तेव्हा निर्भयपणे बोलतात. अलीकडेच मुकेश खन्ना टीव्हीवरील सास-बहू मालिकेवर बोलले.

हेही वाचा: Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISS

सॅटेलाइट टीव्हीचा संपृक्तता बिंदू आला आहे. सगळे एकमेकांची कॉपी करीत आहेत. बिंद्या, झुमके, साडी, लेहेंगा, सासू, सून, नणंद, वहिनी आणि मुलींचे साम्राज्य चॅनलवर सुरू आहे. प्रत्येक मालिकेत ते अधिक वैम्प एक्सप्रेशन घेऊन फिरत असतात, असेही मुकेश खन्ना (Mukesh Khanna) म्हणाले.

मी काही वर्षांपूर्वी एक गोष्ट बोलली होती. सास भी कभी बहू थी ने टीव्ही उद्ध्वस्त केला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याने नुकतेच सांगितले की, आमचा टीव्ही सासू आणि सून यांच्यात कुठेतरी हरवला आहे. दुःखद, पण ते खरे आहे. काहीतरी नवीन विचार करायला हवा, असेही मुकेश खन्ना म्हणाले.

अभिनेता पंकज बेरी यांचे विधान वाचले होते. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की टीव्ही इंडस्ट्री सासू-सुनेमुळे कुठेतरी हरवली आहे. हे वाचून मला बरे वाटले. कारण, मी ही गोष्ट आजपासून सहा वर्षांपूर्वी बोलली होती, असेही मुकेश खन्ना म्हणाले.

हेही वाचा: Shah Rukh Khan : किंग खानची झाली चांदी! सिनेमाच्या रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई

एकता कपूर (Ekta Kapoor) तू सासू-सुनेचे शो बनवून टीव्हीची दुनिया नष्ट केली आहे. सास भी कभी बहू थी या मालिकेने टीव्ही जगताचा सुवर्णकाळ संपवले. जिथे रामायण, महाभारत, चंद्रकांता आणि स्पाय शो बनवले जात होते, ते सॅटेलाइट टीव्हीने संपवले. यामध्ये सर्वांत मोठे शस्त्र ठरले सासू-सुनेचे शो. २० वर्षांपासून सासू-सुनेचे शो टीव्हीवर राज्य करीत आहेत, असेही मुकेश खन्ना म्हणाले.

मुकेश खन्ना व्लॉगमध्ये टीव्ही शोबद्दल खूप राग व्यक्त करताना दिसले. विशेषत: एकता कपूरवर. कारण, त्यांना वाटते की एकताच्या शोमुळे टीव्हीवरील सर्वोत्तम शोची लोकप्रियता कमी झाली आहे. मुकेश खन्ना यांना जे काही सांगायचे होते ते सांगितले. आता प्रेक्षक ठरवतील त्यांना काय बघायचं आणि काय नाही.