Elvish Yadav throwback : शाहरुखच्या मुलाची आर्यनची एल्विशनं केली होती टिंगल, आता...

या सगळ्यात एल्विशनं आजवर ज्या प्रकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ती प्रकरणं समोर आली आहेत.
Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan
Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan

Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan : बिग बॉस ओटीटी २ चा विजेता म्हणून एल्विश यादवची क्रेझ वेगळीच होती. त्याचा सोशल मीडियावर असणारा चाहतावर्ग मोठा आहे. आता एल्विशनं जे काही केले त्यामुळे तो सगळ्यांच्या टीकेचा विषय आहे. त्यानं सापाच्या विषाची तस्करी केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी आतापर्यत उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मात्र यात एल्विश यादव नाही. त्यानं अज्ञात स्थळावरुन सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एल्विशनं तर त्याच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. त्यात पशुहक्क चळवळकर्त्या मनेका गांधी यांनी एल्विशवर टीका केली होती. यावर त्यानं देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan :

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

या सगळ्यात एल्विशनं आजवर ज्या प्रकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ती प्रकरणं समोर आली आहेत. त्यात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाचं आर्यन खानच्या एका प्रकरणाचा समावेश आहे. यावेळी एल्विशनं आर्यन खानवर प्रतिक्रिया देऊन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तो चर्चेतही आला होता. आता एल्विशचा सोशल मीडियावरुन एक जूना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं आर्यन खानला रोस्ट केले होते.

एल्विश हा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. तो प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतो हे त्याच्या वागण्या-बोलण्यामुळे अनेकदा दिसून आले होते. आर्यन खानला रोस्ट केल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तो ट्रोलही झाला होता. २०२१ मध्ये आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याबाबत कोणताही ठोस पुरावा एनसीबीला मिळाला नव्हता. त्यामुळे त्याला क्लिन चीट देण्यात आली होती.

आर्यन खानला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा एल्विशनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ केला होता त्यात त्यानं आर्यनची टर उडवली होती. तो म्हणाला होता की, आर्यन खान हा सेलिब्रेटी आहे. आणि त्याच्याकडे इन्फ्ल्युसिंग पावर देखील आहे. त्यामुळेच की काय बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्याच्या बाजूनं बोलताना दिसत आहेत. याचा प्रभाव असा होईल की, अनेकजण पुढे हेच म्हणतील छोटा मुलगा आहे त्याला सोडून द्या ना...

यावरुन आपल्याला काय कळते की, तुम्ही कितीही मोठे सेलिब्रेटी का असेना पण तुम्ही जर चूकीचे काम केले असेल तर तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. बॉलीवूड देखील पाठीशी घालू शकत नाही. अशा शब्दांत एल्विशनं त्याची टिंगल केली होती. त्यानंतर एल्विशच्या बोलण्यातील फोलपणा उघडकीस आला होता.

Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan
Elvish Yadav Reaction : 'ओपन चँलेंज करतो जर मी...' एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, सापांच्या विषाच्या तस्करीचा आरोप

या सगळ्यात एल्विश सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असून त्याच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. अशावेळी सोशल मीडियावर त्यानं यापूर्वी ज्यांच्यावर टीका केली होती ते व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Elvish Yadav throwback video goes viral roasted Aryan Khan
Elvish Yadav News : 'बिग बॉस' फेम एल्विश यादव गोत्यात! छाप्यात सापडले ५ कोब्रा अन् विष; पोलीसांनी दाखल केला FIR

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com