#Emmys 'गेम ऑफ थ्रोन्स'चा 'एमी'मध्ये डंका!

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या टीमसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे, पीटर डिंक्लेज या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

जगतातील सर्वांत लोकप्रिय असा 'एमी अॅवॉर्ड्स सोहळा' काल (ता. 22) लॉस एँजेलिस येथे रंगला. 'गेम ऑफ थ्रोन्स' या सर्वांच्या लाडक्या वेबसिरीजसाठी ही संध्याकाळ म्हणजे पर्वणीच ठरली. 'सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज' या पुरस्काराने 'गेम ऑफ थ्रोन्स'ला सन्मानित करण्यात आले. त्यामुळे लोकांच्या मनामनात रूजलेला 'गेम ऑफ थ्रोन्स' एमीमध्ये आपला डंका वाजवून गेला. 

'गेम ऑफ थ्रोन्स'च्या टीमसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे, पीटर डिंक्लेज या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 'किलिंग इव्ह'साठी जोडी कोमरला मिळाला, पण प्रेक्षकांच्या दृष्टीने हा निकाल काहीसा अनपेक्षित होता, कारण 'गेम ऑफ थ्रोन्स'मधील एमिलिआ क्लार्क हिला हा पुरस्कार मिळणे अपेक्षित होते. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पॉझसाठी बिली पॉर्टरला सन्मानित करण्यात आले. 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मान जेसन बॅटमॅन यांनी ऑझार्कसाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट विनोदी मालिकेचा पुरस्कार फ्लिबॅगला मिळाला. सोशल मीडियावर या सर्वांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर #GameOfThrones व #Emmys हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: emmy 2019 award won by game of thrones