Emraan Hashmi: इम्रान हाश्मीवर दगडफेक, पहलगाममधील धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Emraan Hashmi

Emraan Hashmi: इम्रान हाश्मीवर दगडफेक, पहलगाममधील धक्कादायक प्रकार

Emraan Hashmi News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मी हा गेल्या काही दिवसांपासून जम्मु काश्मीरमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगसाठी दाखल झाला आहे. त्याच्या आगामी ग्राउंड झिरो नावाच्या चित्रपटाचं चित्रिकरण याठिकाणी सुरु आहे. तिथे अचानक अभिनेत्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहलगाम मधील मार्केटमध्ये हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. त्या घटनेचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी इम्रानबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्य़ात आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इम्रान हाश्मी हा त्याच्या ग्राउंड झिरो नावाच्या चित्रपटासाठी चर्चेत आलेला अभिनेता आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. इम्राननं यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान ग्राउंडचे शुटींग संपवून निघाला होता. त्यावेळी काही अनोळखी व्यक्तींनी त्याच्या वाहनावर दगडफेक सुरु केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात त्या व्यक्तींवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यावर कलम 147, 148, 370, 336, 323 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ग्राउंड या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास तो बीएसएफच्या जवानांवर आधारित आहे. त्यात इम्रान हाश्मी हा एका आर्मी ऑफिसरची भूमिका करतो आहे. त्याचे शुटींग हे काश्मीरमधील पहलगाममध्ये सुरु आहे. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर हे करणार आहेत.

Web Title: Emraan Hashmi Bollywood Actor Ground Movie Shooting Stone Pelting Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..