Sridevi: आता श्रीदेवी यांचा 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपट चीनमध्ये घालणार धुमाकूळ, या दिवशी होणार प्रदर्शित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sridevi

Sridevi: आता श्रीदेवी यांचा 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपट चीनमध्ये घालणार धुमाकूळ, या दिवशी होणार प्रदर्शित

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा 2012 मध्ये आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटाला नवा प्रेक्षक मिळाला आहे. खरे तर गौरी शिंदेचा चित्रपट २४ फेब्रुवारीला चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. ही तारीख खूप महत्वाची आहे कारण या दिवशी श्रीदेवी यांची पाचवी पुण्यतिथी देखील आहे.

गौरी शिंदे दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट चीनमध्ये ६,००० स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. 2012 टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा वर्ल्ड प्रीमियर झाला, जिथे त्याला प्रेक्षकांकडून पाच मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळाला.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडला होता. 2022 मध्ये या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली. 'इंग्लिश विंग्लिश'मध्ये आदिल हुसैन, सुमीत व्यास, प्रिया आनंद, सुलभा देशपांडे आणि फ्रेंच अभिनेता मेहदी नेबू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता हा चित्रपट चिनी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'श्रीदेवीच्या पाचव्या पुण्यतिथीला 24 फेब्रुवारीला हा चित्रपट चीनमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्रीदेवी 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटाद्वारे 15 वर्षांच्या दीर्घ विश्रांतीनंतर चित्रपटांमध्ये परतली होती. 2013 अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीमध्ये हा चित्रपट भारताचा अधिकृत प्रवेश होता.

या चित्रपटात श्रीदेवीने एका गृहिणीची भूमिका साकारली होती, जिचा पती आणि मुलगी इंग्रजी न बोलल्यामुळे तिची थट्टा करतात. नंतर ती अमेरिकेत बहिणीच्या मुलीच्या लग्नाला गेल्यानंतर इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेते. इंग्रजी शिकल्यानंतर, अभिनेत्री शेवटी एक आश्चर्यकारक भाषण देखील देते.