esakal | हा ड्रेस आहे की कचऱ्याची पिशवी? निया शर्मा सोशल मीडियावर ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

nia sharma

हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या वेगवेगळ्या लूकमळे नेहमीच चर्चेत असते.

हा ड्रेस आहे की कचऱ्याची पिशवी? निया शर्मा सोशल मीडियावर ट्रोल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या वेगवेगळ्या लूकमळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची पसंती मिळते. ती नेहमी वेगवेगळे लूक ट्राय करत असते. तिचा फॅशन सेन्स हटके आहे हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून कळते. अशाच एका हटके ड्रेसमधील फोटो नियाने पोस्ट केले आहेत. मात्र यावेळी ती चाहत्यांकडून चांगलीच ट्रोल झाली आहे. 

नियाने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हा ड्रेस कचऱ्याच्या पिशवीसारखा दिसत आहे अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. तर हा ड्रेस काहींना छत्रीसारखा वाटला तर काहींना गाडीच्या कव्हरसारखा वाटला. एकानेतर चक्क 'गाडी वाला आया घरसे कचरा निकाल' हे गाणं  कमेंटमध्ये लिहिलं.

हेही वाचा : 'येऊ कशी..' मालिकेतल्या ओमकारच्या आयुष्यातील खरी स्वीटू कोण माहितीये का?

नियाच्या या फोटोला दोन दिवसात दोन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पण या फोटोच्या कमेंट्स वाचून प्रत्येकालाच हसू येत आहे. या फोटोमध्ये  नियाने काळ्या रंगाची टोपी आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. हा लूक करण्याचं धाडस केल्याबद्दल अनेकांनी तिचं उपहासात्मक कौतुक केलं आहे. निया लवकरच 'जमाई राजा 2.0' या मालिकेत निया दिसणार आहे.
 

loading image