सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सलमान खान आताचा सुपरस्टार. बॉलीवूडचे सगळेच निर्माते त्याच्यासोबत काम करायला उत्सुक आहेत. सलमानचा जिजू म्हणजेच अतुल अग्निहोत्री फार पूर्वीपासून त्याला घेऊन चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार होते; पण त्यांनी स्क्रिप्ट लिहायला इतका वेळ लावला की सलमानच्या प्रतीक्षेचा अंत झाला आणि त्याने त्यांचा नाद सोडून दिला. त्यानंतर अतुलने सलमानबरोबर ‘बॉडीगार्ड’ चित्रपट बनविला. तो सुपरहिट झाला. आता अतुल त्याचा दुसरा भाग बनविण्याच्या तयारीत आहे.

इतक्‍या वर्षांनंतर आता त्या चित्रपटाचं नाव ठरलंय. ते आहे ‘भारत.’ नावावरून सिनेमा देशभक्तीपर असेल असं वाटतंय; पण अतुलने काही खुलासा केलेला नाही. त्याचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे. सध्या सलमान आणि अली अब्बास ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तो चित्रपट पूर्ण झाला की ते ‘भारत’च्या कामाला लागतील. ‘भारत’मध्ये सलमानची हिरोईन कोण असेल त्याबाबत अजूनही कोणती चर्चा सुरू झालेली नाहीय. कदाचित कतरिना कैफचीच वर्णी लागेल असं दिसतंय...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entertainment salman khan bharat movie