माझ्याबरोबर जेवण नाही तर 'नो शुटींग'

Entertainment Vidya Balan Refuses to Have Dinner With Minister
Entertainment Vidya Balan Refuses to Have Dinner With Minister

मुंबई - कधी कुणाला कसला राग येईल हे काही सांगता येत नाही. इगो प्रॉब्लेम तर सगळ्यात भयंकर म्हणावा असा प्रकार आहे. त्याचा फटका प्रख्यात अभिनेत्री विद्या बालनला बसला आहे. विद्याच्या शेरनी चित्रपटाचं शुटींग मध्यप्रदेशामध्ये सुरु असताना तिला एका राजकीय नेत्याकडुन जेवणाचं निमंत्रण आलं. विद्याची आणि त्या नेत्याची भेटही झाली होती. पण अचानक काय बिनसलं कोण जाणे. तेही रागाला गेले आणि विद्याही.

मध्यप्रदेशातील वनमंत्र्यांचा राग टोकाला गेल्य़ाचे दिसून आले आहे. वास्तविक कारण काय होतं. हे विद्यालाच माहिती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्याचा शेरनी नावाचा चित्रपट येतो आहे. त्याच्या शुटींगचे काम सुरु आहे. मध्यप्रदेशात होत असलेलं हे चित्रिकरण पाहण्यासाठी मध्यप्रदेशचे वनमंत्री विजय शाह गेले असताना त्यांची विद्या बालन यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्य़ावेळी तिला डिनरचे निमंत्रण दिले. मात्र विद्याने काही कारणास्तव त्याला नकार दिला आणि तिला शुटिंगच्यावेळी अडचणी येऊ लागल्या.

बालाघाटमध्ये विद्याच्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू होते. विद्याच्या शेरनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी 20 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान  परवानगी मिळाली होती. यावेळी मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटीसाठी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 अशी वेळ ठरली होती. यानंतर, वनमंत्री सायंकाळी चार वाजता महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाणार होते.  मात्र विद्या आणि वनमंत्र्यांची भेट सायंकाळी 5 वाजता झाली. त्यांनी विद्याला रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रण दिले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या त्यावेळी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने तिने या निमंत्रणाला नकार दिला. याचा परिणाम विद्याच्या शूटिंगवर झाला असा आरोप करण्यात येतो आहे. दुसर्‍या दिवशी जेव्हा चित्रपटाचं यूनिट नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या गाड्या रोखण्यात आल्या. त्यांना शूटिंगची परवानगी नाकारण्यात आली. अखेर मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) नरेंद्र कुमार सनोदिया यांच्या सहकार्यामुळे शूटिंगला सुरुवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com