
नाटक,मालिका,सिनेमा यातनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले (Bhargavi Chirmule) आता कलर्स मराठी वाहिनीवर 'आई-मायेचं कवच' (Aai Mayecha Kavach) या मालिकेतनं आपल्या समोर आली आहे. मालिकेत तिनं साकारलेल्या आईच्या भूमिकेविषयी खूप चर्चा होतेय. एखादी आई इतकी बंधन कशी काय घालू शकते मुलीवर असंही कुणी म्हणतंय तर एकटी आपल्या मुलीची जबाबदारी पेलणारी आई म्हणून ती जे निर्णय घेतेय ते पूर्ण चुकतही नाहीयेत अशा प्रतिक्रियाही मिळत आहेत. पण प्रत्यक्षात भार्गवीला ती आई पटतेय का? याविषयी तिनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे. याचबरोबर नकळतं तिनं मालिकेतला एक अकल्पनीय इंटरेस्टिंग ट्रॅकही बोलता बोलता सांगितलाय. जो बातमीत जोडलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत आपण नक्की ऐकू शकाल.
सध्या मालिकेत एक आई मुलीला शोधण्यासाठी किती आटापिटा करतेय हे आपण पाहतोय. पण ती मुलगी मात्र आईला दरवेळेला भूल देऊन हातातून निसटतेय. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे संपूर्ण मालिका हेच पाहायचं का?ती मुलगी कधी सापडणार? त्यानंतर पुढे काय घडणार?आई-मुलीचं नातं कसं बदलणार? याविषयावरही भार्गवीने अनेक खुलासे केले. पण तिनं जे सांगितलं ते सारंच नेहमीपेक्षा किंवा आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळं आहे. थोडक्यात अकल्पनीय आहे. भार्गवीनं बोलता बोलता याचा अंदाज आपल्या मुलाखतीत दिला अनं ते अकल्पनीय वळण ऐकल्यावर दोन सेकंद मलाही 'असं घडू शकतं का?' हा प्रश्न पडला.
याव्यतिरिक्त भार्गवीनं तिची आई किती कडक आहे,ती एवढी मोठी होऊनही आईला किती घाबरते,पार्टीला गेल्यावर उशिर होणार हे आईला कळवताना तिची अवस्था काय असते हे देखील गमतीशीरपणे सांगितलं आहे. भार्गवी सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा ती आपल्या कामासंदर्भातल्या किंवा वैयक्तिक जीवनाविषयीच्या पोस्ट शेअर करताना दिसते. पण याचवेळी सोशल मीडियाचं व्यसन जडवू नका असं सांगायला मात्र ती विसरली नाही. मुलं आणि पालक यांच्यातील नात्यावरही तिनं सुंदर भाष्य केलं आहे. पण त्यातूनही ते अकल्पनीय वळणावर तिनं केलेलं भाष्य मात्र डोक्यातून जात नाही. काय होणार आहे मालिकेत पुढे...जाणून घ्या 'आई- मायेचं कवच' मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या भार्गवी चिरमुलेकडून.बातमीत त्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक जोडत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.