बिग बॉसच्या घरातील 'ही'व्यक्ती होती विशाल निकमची नावडती ...

'ईसकाळ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं नाव,केले अनेक खुलासे..पहा व्हिडीओ
Vishal Nikam, Mahesh Manjrekar and other contestants
Vishal Nikam, Mahesh Manjrekar and other contestantsGoogle

'बिग बॉस सिझन 3' चा विजेता म्हणून अखेर विशाल निकमचं(Vishal Nikam) नाव घोषित झालं आहे. १०० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर विशालनं मोठ्या खिलाडूवृत्तीनं आपलं नाव विजेत्या ट्रॉफीवर कोरलंय. 'ईसकाळ' ला दिलेल्या विशेष मुलाखतीतनं त्यानं कोणते गुण अंगीभूत होते म्हणून आपण बिग बॉसच्या घरात राहू शकलो यावर मनमोकळा संवाद साधला. घरातील आवडती व्यक्ती व नावडती व्यक्ती कोण याविषयीही तो स्पष्टपणे बोलला. 'बिग बॉस' नं माझा प्रवास आता सुखमय बनवलाय तसंच मला त्या घरानं पुढील आयुष्य जगायला तयार केलंय असंही तो म्हणाला. विशाल निकमनं 'ईसकाळ'शी साधलेल्या दिलखुलास संवादातनंअनेक खुलासे केले आहेत. आता ते स्फोटक खुलासे आणि घरातील विशालच्या नावडत्या व्यक्तीचं नाव ऐकण्यासाठी मात्र आपल्याला खाली जोडलेला व्हिडीओ इंटरव्हयू ऐकावा लागेल. कारण बातमीत त्याचं उत्तर अनुत्तरीत आढळून येईल.

ईसकाळनं घेतलेली विशाल निकमची मुलाखत नक्की ऐका. बिग बॉसच्या घराविषयी,घरातल्या इतर स्पर्धकांविषयीचे स्फोटक खुलासे ऐकून व्हाल थक्क.

सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातनं आलेल्या विशालनं शोच्या सुरुवातीपासूनच आपल्यातला खरा माणूस दाखवायला सुरुवात केली होती. तेव्हा किंवा आताही कोणाला वाटलं असेल हा उगाच साधं वागायचा का प्रयत्न करतोय,तर मी असाच आहे,असं विशाल या मुलाखतीत म्हणाला. घरातले सदस्य काहीही बोलले तरी मला फरक पडत नव्हता कारण मला खेळ खेळण्यासोबतच माझ्यातला खरेपणा गमवायचा नव्हता,जे मी शेवटपर्यंत कायम ठेवलं आणि माझ्यातील हाच गुण मला शो चा विनर बनवून गेला असं विशाल म्हणाला. तर घरातल्यांमुळे एक गुण माझ्या अंगी नव्यानं मी रुजवला असंही तो म्हणाला. तो गुण हटके आहे,ऐकुन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वर जोडलेला व्हिडीओ इंटरव्हयू नक्की ऐका.

Vishal Nikam, Mahesh Manjrekar and other contestants
करिनाला शहाणपण येईना;कोरोना गेला उडत म्हणत 'ही' गोष्ट केली...

घरात जे मित्र कमावले त्याचा मला आनंद आहे. पण जे खटके झाले आणि त्यातनं जे विरोधक कमावले त्यांच्याशी बाहेर आल्यावर आता कसं वागायचं हे मी ठरवलंय हे सांगायला तो विसरला नाही. आता ओळखी वाढल्यात,काम मिळेलच पण माझं पहिलं लक्ष्य असेल ते 'आर्मी मॅन' बनण्यासाठी काय करावं लागेल यासाठी मेहनत घेण्याकडे,त्या दिशेने आता पावलं उचलणार. काय आहे विशालचं नेमकं हे 'आर्मी मॅन' बनण्याचं लक्ष्य? ऐका सविस्तर त्याच्या या बातमीत जोडलेल्या व्हिडीओ मुलाखतीच्या माध्यमातनं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com