मराठी चित्रपटांची दिवाळी भेट, 'हे' आहेत पर्याय !

these are the options for marathi movie
these are the options for marathi movie

मुंबई : शाळा, कॉलेज आणि ऑफिस यांना जवळपास दिवाळीची सुट्टी लागलीच आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर प्रत्येक वर्षी कलाकरा आपले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी धडपड करत असतात. यावर्षीदेखील दिवाळीच्या शुभमुहुर्तावर प्रेक्षकांना अनेक चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे फक्त हिंदी सिनेमेच नाही तर, मराठी चित्रपटही बॉक्सऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे यावर्षीची दिवाळीही प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंटने परिपूर्ण असणार आहे. जाणून घ्या दिवाळीमध्ये कोणते मराठी दमदार चित्रपट तुम्ही पाहू शकता !

1. हिरकणी 
“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना त्या आईचं खरोखर नवल वाटतं. शाळेत शिकवलेली हिरकणीची गोष्ट आजही तशीच्या तशी मनात खूप खोलवर घर करुन बसली आहे. राहून-राहून मनात प्रश्न उपस्थित राहतो की, तो कडा हिरकणी नेमकी कशी उतरली असेल कारण ‘हिरकणी कडा उतरली’ इतकंच वर्णन पाठ्यपुस्तकात करण्यात आलं होतं. पण खरं तर, तो कडा किती खोल होता याचा अनुभव हिरकणी सिनेमाच्या टीमने घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दिवाळीची मनोरंजक भेट म्हणून 24 ऑक्टोबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. 
धाडसी आईची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही.“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो”, असं वर्णन कड्याचं करण्यात आलं आहे. तसेच, “दीड गाव खोल दरी” असं देखील वर्णन करण्यात आले आहे. अंगावर शहारे येतील असं वर्णन जर कड्याचं करण्यात आलं आहे तर हिरकणी एका रात्रीत तो कडा कसा उतरली असेल, सुदैवाने ती कडा उतरली तेव्हा कोजागिरीची रात्रं होती म्हणजेच चंद्राचा प्रकाश होता.पण, तरी देखील तिला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या असतील याचा विचार सिनेमाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांनी केला.

सोनाली कुलकर्णी या गुणी अभिनेत्रीनं कायमच वेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न केलाय. ऐतिहासिक कथेवर आधारीत अजिंठा चित्रपटातील पारोनंतर सोनाली पुन्हा एकदा एक ऐतिहासिक व्यक्तीरेखा साकारत आहे. उत्तम गायक, उत्तम अभिनेता असलेल्या प्रसाद ओक यानं हिरकणी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाच्या ट्रेलरवरून प्रसादनं ही ऐतिहासिक कथा उत्तम हातळल्याचं वाटत आहे. सिनेमाची पटकथा चिन्मय पाटणकरनं लिहिली आहे. संजय मेमाने याने सिनेमाचे छायाचित्रण केले असून, अमरितराज यांनी संगीत दिलंय.

2. ट्रिपल सीट
मराठी चित्रपटसृष्टीचा स्टाइल आयकन आणि चॉकलेट बॉय अंकुश चौधरी याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या बहुचर्चित सिनेमाचं नाव 'ट्रिपल सीट' आहे. गेल्या बऱ्याच काळापासून य़ाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता वाढली होती. अखेर हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. तब्बल एक वर्षानंतर अंकुश झळकणार आहे. ट्रिपल सीट याचित्रपटामध्ये शिवानी सुर्वे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पहिल्यांदाच अंकुश आणि शिवानी ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकताना दिसेल. शिवानी सुर्वे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वामध्ये होती. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या उत्त्म खेळीने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 

याशिवाय सिनेमामध्ये अभिनेत्री पल्लवी पाटीलही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पल्लवी याआधी शेंटीमेंटल, सविता दामोदर परांजपे, बॉइज 2 या चित्रपटांतून झळकली आहे. एकुणच दोन हिरोइनस् आणि एक हिरो असणाऱ्या या चित्रपटाची कथा नक्कीच मजेशीर असणार आहे. 

चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटिव्ह डिरेक्शन अॅड. अभिजित दळवी यांनी केलं आहे. दमदार कास्ट आणि उत्तम दिग्दर्शनने परिपूर्ण असणाऱा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच एक उत्तम पर्याय असणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com