esakal | जगप्रसिद्ध लेखकाशी लग्न केलं, पद्माच्या पदरी आली निराशा...
sakal

बोलून बातमी शोधा

जगप्रसिद्ध लेखकाशी लग्न केलं, पद्माच्या पदरी आली निराशा...

जगप्रसिद्ध लेखकाशी लग्न केलं, पद्माच्या पदरी आली निराशा...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या लेखकाला आपल्या एका कलाकृतीमुळे जीव वाचवत दुसऱ्या देशाचा आसरा घ्यावा लागला होता. त्या सलमान रश्दींची salma rusdie गोष्ट ही काही वेगळीच आहे. ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसून येतात. काही झालं तरी आपल्या मतांवर ठाम असणारे रश्दी यांचे विचार अनेकांना प्रचंड टोकाचे आणि धर्मद्रोही स्वरुपाचे वाटतात. आपल्या सॅटनिक व्हर्सेस satnic verses या कादंबरीमध्ये एका धर्माला त्यांनी वेगळ्या स्वरुपात सादर केले होते. त्याची किंमत त्यांना चूकवावी लागली होती. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. संबंधित देशांनी त्यांना जीवे मारण्याचे फतवेही काढले होते. अशा सलमान रश्दी यांचा वाचकवर्ग मोठा आहे. जगभर त्यांचा वाचकवर्ग पसरला आहे. अशा रश्दी यांचं वैवाहिक आयुष्य हे फार वादाचं ठरलं.

पद्मा लक्ष्मी padma laxmi ही एक लेखिका, अभिनेत्री, मॉडेल, निर्माती आहे. तिचा आज जन्मदिवस आहे. ती एक मोठी सोशल सेलिब्रेटी आहे. चेन्नईतील एका कुटूंबात जन्माला आलेल्या पद्मानं मोठ्या संघर्षानं आपली वाट निर्माण केली. ती एक लोकप्रिय संवादकही आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या पद्मानं सलमान रश्दींबरोबर लग्न केलं होतं. पहिल्या पतीपासून ती काडीमोड घेतला होता. त्यानंतर ती तिच्या आईसोबत न्युयॉर्कमध्ये आली. पद्माचं इंग्रजी, हिंदी, तमिळ, स्पॅनिश या भाषांवर प्रभूत्व आहे. तिच्याकडे एक प्रेरणादायी अभिनेत्री म्हणूनही पाहिलं जातं.

वयाच्या १८ व्या वर्षी पद्मानं मॉडेलिंगला सुरुवात केली होती. स्पेनमधल्या एका शहरात ती कॅफेमध्ये बसली असताना तिला एका फोटोग्राफरनं पाहिलं. तिथूनच तिचं नशीब बदललं. २००३ मध्ये तिनं बुम बुम नावाच्या चित्रपटातून तिनं बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यात तिनं शिला बार्डेजची भूमिका साकारली होती. पुढे २००४ मध्ये तिनं प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्याशी लग्न केलं. त्यांची ओळख १९९९ मध्ये झाली होती. त्यावेळी सलमान रश्दी हे ५१ वर्षांचे होते. आणि त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीला घटस्फोट दिला होता.

पद्मा लक्ष्मी वयाच्या २८ व्या वर्षी सलमान रश्दी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. रश्दी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पद्मानं आत्मचरित्र लिहिलं. त्यात तिनं आपल्या संसाराविषयी लिहिलं आहे. मी रश्दी यांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर आमचं ते नातं संपुष्टात आलं होतं. त्यांच्यासोबत माझे फिजिकल रिलेशन हे वेदनादायी होते. त्यामुळे आमच्यात अनेक वाद झाले. त्यामुळे मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. अशी प्रतिक्रिया पद्मानं दिली होती.

loading image
go to top