
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका व्यक्तिसोबत हात मिळवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत दिसणारी ती व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचं अनेकांनी म्हटलंय.
मुंबई- सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा व्हायरल होणा-या फोटोंमागचं सत्य जाणून घेण्याआधीच ती शेअर केली जाते. असंच काहीसं घडलं ते बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये अमिताभ बच्चन एका व्यक्तिसोबत हात मिळवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत दिसणारी ती व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचं अनेकांनी म्हटलंय.
व्हायरल होणा-या बिग बींच्या यो फोटोसोबत कॅप्शन देखील शेअर केलं जात आहे. 'रिश्ते मै तो हम तुम्हारे बाप लगते है पर मै आपका गुलाम हुं. दाऊद इब्राहिम आणि अमिताभ बच्चन यांचा जुना फोटो आता रिलीज झाला आहे. तेव्हाच तर जया बच्चन बॉलीवूड ड्रग कनेक्शनवर चकित झाल्या आहेत. शेम ऑन अमिताभ बच्चन.' असं कॅप्शन देत हा फोटो व्हायरल होत आहे.
हा फोटो आणि यावरिल कॅप्शन मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्यावर आता अभिषेक बच्चनने एका ट्विटर युजरला उत्तर दिलं आहे ज्यामध्ये या व्हायरल फोटोमागचं सत्य त्याने सांगितलं आहे. अभिषेकने लिहिलंय, 'भावा, हा फोटो माझे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण यांचा आहे.' अभिषेकने ज्या यूजरला उत्तर दिलं होतं त्याने त्याची पोस्ट आता डिलीट केली आहे.
भईसाहब, यह फ़ोटो मेरे पिताजी और महाराष्ट्र के पूर्व मुख्य मंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण की हैं।
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 18, 2020
जया बच्चन यांनी विधानसभेत कंगना आणि रवि किशन यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. अनेकजण सोशल मिडियावर बच्चन यांच्या पूर्ण कुटुंबाला ट्रोल करत आहेत.
fake picture of amitabh bachchan with dawood ibrahim goes viral as abhishek bachchan reveals the truth