'KBC करण्यासाठी कुटुंबाने दिला होता नकार' - अमिताभ बच्चन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

'कौन बनेगा करोडपती' या कार्यकर्माची जादू कायम आहे.त्याचं एक खास कारण म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन. ​

मुंबई : भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' होय. वर्षानुवर्षे या कार्यकर्माची जादू कायम आहे. गेल्या 19 वर्षांपासून हा शो तितक्याच लोकप्रियतेने चालू आहे. त्याचं एक खास कारण म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन. त्यांनी अनोख्या शैलीने हा कार्यक्रम होस्ट केला. आजही या शोचे चाहते आहेत आणि खासकरुन अमिताभ यांच्या होस्टींगचे! 

अमिताभ यांनी इतके वर्ष शो होस्ट केला पण, त्यासंबंधी अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हालाही माहित नसतील. या शोची ऑफर 2002 मध्ये अमिताभ यांना आली. पण त्यावेळी अमिताभ अतिशय कठीण काळातून जात होते. खडतर वेळेतून जात असल्यामुळे या शोची ऑफर आल्यानंतर त्यांनी लगेचच होकार दिला. मात्र एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी अमिताभ यांना कुटुंबाने हा शो करण्यासाठी नकार दिला होता. बिग बींच्या निर्णयाला कुटुंबाने विरोध केला. सिमी ग्रेवालच्या चॅट शो दरम्यान ते बोलत होते. 

त्यावेळी बिग बी आर्थिक अडचणींमध्ये होते आणि त्यामुळे त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' हा शो करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी विचारदेखील केला नाही की, बॉलिवूडमधले ते एक मोठे कलाकार आहेत आणि छोट्या पडद्यावर काम करु नये. त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होऊ शकते. असं मत बिग बी यांच्या कुटुंबाने व्यक्त केलं होतं. जया बच्चन आणि त्यांची मुलं बिग बींच्या निर्णयाविरोधात होते. 'टिव्ही शो ची ऑफर येणं आम्हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक होत. जयाने मला सांगितले की टिव्हीवर काम केल्याने माझी इमेज खराब होऊ शकते. कारण तो एक छोटा प्लॅटफॉर्म आहे. पण, माझ्याकडे कोणताही पर्याय त्य़ावेळी नव्हता. त्या परिस्थितीत मला कोणी लादी पुसण्यासाठी सांगितलं असतं तर ते देखील मी केलं असतं.' असं मत अमिताभ यांनी व्यक्त केलं.

त्य़ानंतर मात्र जया आणि घरातल्या सदसद्यांशी बोलून त्यांनी हा शो करण्याचा निर्णय घेतला. या शो नंतर अधिक काम मिळण्यास सुरुवात झाली. या शोनंतर बिग बींनी 'मोहब्बतें' चित्रपटामध्ये काम केलं. 'कौन बनेगा करोडपती' आणि 'मोहब्बतें' एकाचवेळी सुपरहिट झाले आणि बिग बींच्या करिअरला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Family was against of me for the hsoting of KBC show said amitabh bacchan