
लंडनमधील शुटिंग संपवून इरफान खान भारतात परतला आहे. मुंबई विमानतळावर त्याला पाहण्यात आले. मात्र...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चं शुटिंग करत होता. लंडनमधील शुटिंग संपवून तो भारतात परतला आहे. मुंबई विमानतळावर त्याला पाहण्यात आले. मात्र इरफान व्हिलचेअर आपला चेहरा लपवताना दिसला.
व्हिलचेअरवर इरफानला पाहून त्याचे चाहते चिंतीत आहेत. इरफान बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. त्यासाठी तो लंडनमध्ये उपचारदेखील घेत होता. काही महिन्यांपूर्वी तो भारतात परतला आणि 'हिंदी मीडियम' चा सीक्वल असलेला 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली. मात्र व्हिलचेअरवर दिसलेला इरफान अजुनही पूर्णपणे बरा झालेला नाही असं वाटत आहे. इरफानदेखील त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिलचेअरवरील फोटो पाहिल्यानंतर त्याचे अनेक चाहते तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत.
या गंभीर आजारामुळेच इरफान मोठ्या पडद्यापासून बराच काळ दुरावलेला होता. 'कांरवा' या चित्रपटातून तो शेवटी दिसून आला. त्यानंतर आता 'अंग्रेजी मीडियम' मध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे. इरफानसोबत या चित्रपटामध्ये राधिका मदान आणि करीना कपूर खान दिसणार आहेत. 'हिंदी मीडियम' हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता.