प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमानची नवी इनिंग

संतोष भिंगार्डे
Saturday, 29 August 2020

आता रेहमान प्रेझेंटरची नवी भूमिका करीत आहे. 'अटकन चटकन' हा हिंदी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि या चित्रपटाचा प्रेझेंटर रेहमान आहे.

मुंबई ः प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान आता एक वेगळी इनिंग खेळायला जात आहे. आतापर्यंत त्याने चित्रपटांना संगीत दिले आणि तमाम रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्यांची अनेक गाणी कमालीची लोकप्रिय ठरली आहेत आणि त्यांना अत्यंत मानाचे असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

कंगना रानौतचा 'तेजस' डिसेंबरमध्ये घेणार टेक ऑफ

मात्र आता रेहमान प्रेझेंटरची नवी भूमिका करीत आहे. 'अटकन चटकन' हा हिंदी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि या चित्रपटाचा प्रेझेंटर रेहमान आहे. हा चित्रपट एक म्यूझिकल ड्रामा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शिव हरे यांनी केले आहे. आणखीन एक विशेष म्हणजे चित्रपटाची गाणी अमिताभ बच्चन, हरिहरन, सोनू निगम आदींनी गायली आहेत. अटकन चटकनचे कथानक गुड्डू नावाच्या चहा विकणाऱ्या मुलाभोवती फिरणारे आहे, जो इतर तीन मुलांसह त्यांचा बँड बनवतो.  शहरातील एका अग्रगण्य संगीत स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय ते घेतात. त्यानंतर त्यांची स्वप्ने पूर्ण होतात की नाही हा प्रवास या चित्रपटातून दाखवला आहे. बाल पियानो वादक लिडियन नाधास्वरम या चित्रपटात गुड्डूची भूमिका साकारीत आहे.  

सीबीआय चौकशीनंतर रिया चक्रवर्ती पोलिस ठाण्यात का गेली? भाजप आमदाराने केला सवाल

    चित्रपटाचे पोस्टर शेअर करत रेहमान यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “5 सप्टेंबर रोजी अटकन चटकन या चित्रपटाचा प्रीमियर होत आहे हे जाहीर करण्यास आनंद झाला आहे.  गुड्डू आणि त्याच्या मित्रांची कथा आशा, स्वप्ने आणि लयबद्ध बीट्सने परिपूर्ण आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा!”  त्याचप्रमाणे सचिन चौधरी, यश राणे आणि तमन्ना दीपक आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार  आहेत. अटकन चटकन हा चित्रपट झी 5 वर 5 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

--------------------------------------------

संपादन - त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Famous musician and singer A. R. Rehmans new innings