Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खान यांनी केली नोकराला मारहाण, धक्कादायक व्हिडीओ समोर

राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ समोर आलाय
Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol missing
Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol missing SAKAL

Rahat Fateh Ali Khan News: पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये राहत आपल्या नोकराला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. दारूची बाटली कुठे गेली? असा संतप्त सवाल राहत नोकराला विचारत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाकिस्तानातील लोकही गायकावर टीका करत आहेत.

Famous singer Rahat Fateh Ali khan beating his servent for bottle of Alcohol missing
Bobby Deol Birthday: ५ थरांचा केक अन् भलामोठा हार, लॉर्ड बॉबीच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

राहतने नोकराला बेदम मारलं

व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळतंय की, राहत यांनी नोकराचे केस पकडून ठेवले आणि नंतर हातातल्या चप्पलने त्याच्या डोक्यावर जोरदार मारहाण केली.

नोकर घाबरून तिथून निघून गेल्यावर ते त्याच्याजवळ जातात आणि मग दारूची बाटली कुठे गेली असे विचारतात. नोकर काही बोलत नाही.

यावेळी राहत पुन्हा त्याचे केस पकडतो आणि त्याला मारायला लागतो. एकमेकांना मारताना दोघेही खाली पडतात. शेजारी उभे असलेले राहत यांना थांबवतात. पण ते नोकराला मारहाण करणे थांबवत नाहीत.

व्हिडीओ व्हायरल होताच राहत यांनी मागितली माफी

अशा परिस्थितीत राहत यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मारहाण केलेल्या नोकरासोबत उभे आहेत. या व्हिडिओत राहत आधी नोकराची माफी मागतात.नंतर म्हणतात.

"तुम्ही पाहिलेल्या व्हिडिओमध्ये गुरु आणि शिष्य यांच्यातील परस्पर संबंध आहे. गुरु आणि शिष्य यांचे नाते असे आहे की, जेव्हा शिष्य चांगले काम करतो तेव्हा त्याच्यावर प्रेम केले जाते आणि जेव्हा त्याने चूक केली तेव्हा त्याला फटकारलेही जाते."

नोकराची प्रतिक्रिया

राहत फतेह अली खान यांचा माफीचा व्हिडीओ येताच लोकं म्हणतात की, तुम्ही खोटे बोलून लोकांना वेडे बनवत आहात ते चुकीचे आहे.

व्हिडिओमध्ये नोकर सांगतो की, "ज्या बाटलीबद्दल बोलले जात आहे ती दारूची बाटली नसून ते एक पवित्र जल आहे. मी ते कुठे ठेवले ते विसरलो. राहत आमचे शिक्षक आहेत, ते आमच्यावर खूप प्रेम करतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी गैरसमज करुन घेतलाय. आमच्या उस्तादजींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आमच्यावर खूप प्रेम करतात. मी बराच काळ त्यांच्यासोबत आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com