Happy Birthday Rajinikanth : 'दक्षिणेतील देव' आता दिसणार 'दरबार'मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajinikanth

रजनीकांत ह्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन (मराठी भाषक) कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.

Happy Birthday Rajinikanth : 'दक्षिणेतील देव' आता दिसणार 'दरबार'मध्ये

चेन्नई : 'दक्षिणेतील देव' अशी ओळख म्हणजे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत. रजनीकांत यांना 69 व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. ट्विटरवरून त्यांना विविध माध्यमांतून शुभेच्छा देताना त्यांच्या आगामी 'दरबार' या चित्रपटाचे पोस्टर्सही प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते, थलायवा, सुपरस्टार रजनीकांत हे 'दरबार' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ए. आर. मुरुगादास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नयनतारा, निवेथा थॉमस, दलीप ताहिल, सोरी, हरीश उथमान, जीव, मनोबाला, सुमन, आनंदराज, राव रमेश, बोस वेंकट, प्रकाश राज, नवाब शाह आणि योगी बाबू हे कलाकार या चित्रपटात सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून सुनील शेट्टी तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसेच प्रतिक बब्बर या चित्रपटात नकारात्मक भूमिका निभावताना दिसणार आहे. हा ऍक्शन थ्रिलर चित्रपट रजनीकांत यांचा 167 वा चित्रपट ठरणार आहे. 

पांडियान (1992) नंतर म्हणजे जवळजवळ 25 वर्षांनंतर रजनीकांत यांनी या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे. जानेवारी 2020 मध्ये 'पोंगल' सणाला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील त्यांच्या चाहत्यांनी आणि दक्षिणेतील प्रमुख कलाकारांनीही दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

रजनीकांत ह्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन (मराठी भाषक) कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत आहेत.