'ये रिश्ता क्या कहलाता है'चा महा-एपिसोड पाहून चाहत्यांचा संताप अनावर; कारण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही सिरियलचा महा-एपिसोड पाहून चाहत्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेचे दर्दी चाहते कार्तिक आणि नायरा यांना दूर जाताना पाहूच शकत नाहीत. असे काही झाले की, चाहत्यांचा संताप अनावर होतो.

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही सिरियलचा महा-एपिसोड पाहून चाहत्यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मालिकेचे दर्दी चाहते कार्तिक आणि नायरा यांना दूर जाताना पाहूच शकत नाहीत. असे काही झाले की, चाहत्यांचा संताप अनावर होतो.
 

‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या महा-एपिसोड बाबतीतही असेच काहीसे झालेले पाहायला मिळाले आहे. महा-एपिसोडमध्ये बराच ड्रामा पाहायला मिळाला. कार्तिकमुळे वेदिका आणि नायरा पहिल्यांदा एकमेकींसमोर आल्याचेही दिसले. यादरम्यान कार्तिक वेदिकाला नायराची ‘माझी एक्स-वाईफ’ ओळख करून देतो. कारण कार्तिकचे लग्न आता वेदिकाशी झाले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील हा सीन पाहून चाहते खवळले आहेत.
 

सोशल मीडियावर याबद्दलचा संताप व्यक्त केला जात असून मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला श्रद्धांजली वाहत #RIPDirectorsKutProductions या टॅगचा वापर करत अनेक वाईट प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. #RIPDirectorsKutProductions हा ट्रेंड सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fans lashes out at yeh rishta kya kehlata hai makers as kartik introduced naira as his ex-wife