Rakhi Sawant Mother Death: अंतिम दर्शनाला आलेली फराह खान का भडकली? व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farah khan, rakhi sawant mother death, rakhi sawant mother dies

Rakhi Sawant Mother Death: अंतिम दर्शनाला आलेली फराह खान का भडकली? व्हिडिओ व्हायरल

Rakhi Sawant Mother die: राखी सावंतच्या आईचं काल २८ जानेवारीला निधन झालं. राखीची आई गेले अनेक महिने हॉस्पिटलमध्ये दाखल होती. राखी जेव्हा बिग बॉस मराठी मध्ये सहभागी होती तेव्हा बाहेर आल्यावर राखीची आई हॉस्पिटलमध्ये दाखल होती. राखीच्या आईवर आज ख्रिश्चन धर्मानुसार अंतिम संस्कार करण्यात आले. राखीच्या आईच्या अंतिम दर्शनाला अभिनेत्री आणि कोरिओग्राफर फराह खान सुद्धा उपस्थित होती. पण अंतिम संस्काराला आलेली फराह खान एका गोष्टीमुळे मात्र भडकली.

फराह तिच्या गाडीतून अंतिम संस्काराला आली. तेव्हा तिथे असलेली माणसं फराह खानचा फोटो आणि व्हिडिओ काढत होते. तेव्हा फराह त्यांच्यावर भडकली. "कशाला फोटो काढताय, मी कुठे आलेय मी याचं भान ठेवा" असं फराह खान त्यांना म्हणाली. याशिवाय फराह जेव्हा अंतिम दर्शन घेऊन निघाली तेव्हा सुद्धा ती फोटो काढणाऱ्यांवर भडकली.

बाहेर आल्यावर फराहने मीडियासमोर राखीच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या.. फराह म्हणाली,"आई नेहमीच महत्वाची असते. मी तिला जास्त भेटले नाही पण प्रत्येक वेळी आई जेव्हा आजारी होती तेव्हा मी राखीला कॉल करत असे आणि मला वाटते, तुम्ही सर्वांनी कृपया तिला काही स्पेस द्यावी. ती शोक करत आहे. मला खात्री आहे की राखीने तिच्या आईचा नेहमीच अभिमान बाळगला आहे आणि ती पुढेही आपल्या कामाच्या माध्यमातून हे करत राहील."

ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली अभिनेत्री राखी सावंतची आई जया भेडा यांचे शनिवारी २८ जानेवारीला दुःखद निधन झाले. राखी आईच्या निधनानंतर संपूर्णपणे कोसळली आहे. अखेर नुकतंच ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार राखीच्या आईवर अंतिमसंस्कार करण्यात आले. आईला निरोप देताना राखी सतत रडत होती. तिचा नवरा आदिल तिच्यासोबत होता. राखी आणि तिच्या कुटुंबीयांनी आईला निरोप देताना श्रद्धांजली पूर्वक गाणं गाऊन त्यांना निरोप दिला