
'आधी तुझ्या लेकीला आवर..' फराह खानचा चंकी पांडेला सल्ला..
अभिनेता चंकी पांडे (chunky panday) आणि फराह खान (farah khan) यांच्यात झालेला एक संवाद सध्या शोधल मीडियावर चांगलाच व्हायरल होते आहे. यामध्ये फराह खान हिने चंकीला 'तुझ्या लेकीला आवर' असा सल्ला दिला आहे. पण त्यांच्यातील संवादाला स्वतः अनन्या पांडेच (ananya panday) जबाबदार आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अनन्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत कोरियोग्राफर फराह खान देखील दिसत आहे.
हेही वाचा: 'ती' फेसबुक पोस्ट प्राजक्ता माळीला पडली महागात, शांता शेळकेंचा उल्लेख चुकवला..
या व्हिडीओमध्ये अनन्या मेकअप करताना दिसत आहे. तेव्हा फराह खान त्याठिकाणी येते आणि अनन्याला म्हणते तुला 'खाली पिली' सिनेमासाठी नॅशनल पुरस्कार जाहीर झाला आहे. ही गोष्ट ऐकून अनन्याला प्रचंड आनंद होतो. पण त्यानंतर फराह चंकी पांडेच्या स्टाईलमध्ये म्हणते "आई ऍम जोकिंग.." हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
या कमेंट्स मध्ये एक कमेंट चंकी पांडेनेही केली आहे. 'ओव्हर ऍक्टिंगसाठी 50 रुपये कट...' असं लिहत फराहला त्याने टॅग केलं आहे. एवढंच नाही तर 'फराहने व्हिडीओमध्ये केलेल्या ओव्हर ऍक्टिंगसाठी तुला पुरस्कार मिळायला हवा..' असं लिहिलं आहे. .त्यानंतर फराहने कमेंटमध्ये 'चंकी, आधी तुझ्या लेकीला आवर...' असा सल्ला दिला आहे. अनन्याचा हा व्हिडीओ आणि चंकी, फराहचा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे.
Web Title: Farah Khan Says Apni Beti Ko Sambhal Pehle As Chunky Panday Criticizes Her Acting Skills
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..