फराह खानने उलगडली तिच्या आणि शिरीष कुंदरच्या प्रेमाची गोष्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 17 October 2020

स्पर्धकांनी फराहला तिची आणि शिरीष कुंदरची प्रेम कहाणी सांगण्याची गळ घातली. फराह म्हणाली, “ मला तुम्हाला नाराज करायचे नाही. पण ती एक गोष्ट सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसेल. ती म्हणजे, ‘मैं हूं ना’च्या शूटिंगच्या वेळेस म्हणजे जवळ जवळ 2 वर्षे शिरीष आणि मी एकमेकांशी बोलत नव्हतो.

मुंबई - सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर हा एक लोकप्रिय शो आहे. वीकएंडला या कार्यक्रमात ''रोमान्स'' ही विशेष थीम होती. त्या औचित्याने बॉलीवूडची प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक फराह खान हिने शो मध्ये हजेरी लावली. यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांनी फराह खानने कोरिओग्राफ केलेल्या रोमॅंटिक गाण्यांवर परफॉर्म केले. तेव्हा त्या गाण्यांशी संबंधित आठवणींचा पट तिने प्रेक्षकांसमोर उलगडला. मात्र यासगळ्यात सर्वांच्या लक्षात राहिली ती फराह आणि शिरिष कुंदरच्या प्रेमाची गोष्ट.

अमन या स्पर्धकाने त्याचा कोरिओग्राफर सागर सोबत मैं हूं ना चित्रपटातील ‘तुमसे मिलके दिल का’गाण्यावर परफॉर्म केले. त्याच्या अॅक्टमध्ये एक भाग असा होता, ज्यात स्पर्धक अमन आणि ऋतुजा यांनी शिरीष कुंदर आणि फराह खानचा अभिनय करत प्रेमकहाणी सादर केली. त्या परफॉर्मन्सनंतर फराह म्हणाली, “मंचावर काय चालले आहे, हे समजायला मला थोडा वेळ लागला कारण आपण जे काही या मंचावर पाहिले, तशी माझी प्रेम कहाणी कधीच नव्हती. यानंतर सगळीकडे खसखस पिकली. पुढे ती म्हणाली, कास्टिंग अचूक होते आणि अमनने हुबेहूब तसेच कपडे घातले होते, जसे शिरीषने  हूं ना’च्या शूटिंगच्या वेळेत घातले होते. मीही त्यावेळी ऋतुजा सारखीच दिसत असे.”

याप्रसंगी स्पर्धकांनी फराहला तिची आणि शिरीष कुंदरची प्रेम कहाणी सांगण्याची गळ घातली. फराह म्हणाली, “ मला तुम्हाला नाराज करायचे नाही. पण ती एक गोष्ट सांगितल्यावर तुम्हाला धक्का बसेल. ती म्हणजे, ‘मैं हूं ना’च्या शूटिंगच्या वेळेस म्हणजे जवळ जवळ 2 वर्षे शिरीष आणि मी एकमेकांशी बोलत नव्हतो. आम्ही एकमेकांचा तिरस्कार करत होतो. खरं तर तो त्या चित्रपटाचा एडिटर होता. तरीही मी त्याला भाव देत नव्हते.  तो मला सांगत असे की मी काही दृश्ये आणि शॉट नीट घेतलेले नाहीत. ते ऐकून मला राग यायचा. पण जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग संपले, तेव्हा मी एकदम निवांत झाले होते.

  मी ज्यावेळी लग्न करायचा विचार करत होते, कारण त्यावेळी 2002 मध्ये शाहरुख खानने मला खास सांगितले होते की, कोणामध्येही गुंतू नकोस आणि फक्त चित्रपटावरच लक्ष केंद्रित ठेव. या चित्रपटाचे शूटिंग आणि एडिटिंग पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटासाठीशिरीषने केलेले एडिटिंगचे काम बघून मी त्याच्यावर फिदा झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farah Khan shares details about her unique love story with husband Shirish Kunder