वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला फरहान, व्हिडिओ शेअर करत केले मदतीचे आवाहन

farhan akhtar
farhan akhtar
Updated on

मुंबई : चित्रपटांमध्ये नेहमीच कलाकारांना आपण हिरोंच्या भूमिकेत पाहतो. पण हे कलाकार फक्त चित्रपटातच हिरो म्हणून तर गरज भासल्यास हेच कलाकार खऱ्या आयुष्यात देखील हिरो बनतात. कोरोना विषाणूच्या या संकटात गरजूंना मदत करण्याबरोबरच हे कलाकार आपल्या कोरोना वॉरियर्स यांनीही मदत करत आहेत. अशातच बॉलिवूडचा मिल्खा सिंह अभिनेता फरहान अख्तरने देखील या कोरोना वॉरियर्सची मदत केली आहे. त्याने या कोरोना वॉरियर्सना म्हणजेच डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफला पीपीई किट्सची मदत केली आहे. त्याने सरकारी रुग्णालयाला 1000 पीपीई  किट्सची मदत केली आहे. याची माहिती त्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत दिली आहे. 

त्याने या व्हिडिओमधून इतरांनाही त्यांना जितकी मदत करणं शक्य होईल तितकी मदत करण्याची विनंती केली आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, 'आज मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी इथे आलो आहे. यावेळी आपण सर्व आपल्या घरी सुरक्षित आहोत आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये आहोत. पण बरेचसे असे लोक आहेत,  महिला आणि पुरुष ज्यांनी एक वेगळा मार्ग निवडला आहे. ते लोक म्हणजे हॉस्पिटल मेडिकल टिम आणि स्टाफ. आज आपण सर्व या कोरोना विषाणूची लढाई लढत आहोत.

या लढाईमध्ये हे लोक फ्रंटलाईनवर आहेत. पण आपल्या या वॉरियर्सना पीपीई किट्सची म्हणजेच पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची गरज आहे. जेणेकरून ते आपलं काम व्यवस्थित करू शकतील आणि त्यांना कोरोना होणार नाही ही खात्री त्यांना काम करताना असेल. तर आपण सर्वांनी आपल्या बंधू भगिनींसाठी एकत्र येऊया आणि त्यांची मदत करूया. मी सरकारी रुग्णालयाला 1000 पीपीई किट्सची मदत करत आहे.

माझी तुम्हाला देखील विनंती आहे की तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत करा.' यापुढे त्याने एक वेबसाईट देऊन त्या वेबसाईटवर इतरांनीही मदत करावी असे त्याने सांगितले आहे. आणि जे कोणी ही मदत करेल त्यांचे तो वैयक्तिक आभार माननार आहे. याआधी अनेक कलाकारांनी हॉस्पिटल आणि पोलिसांना पीपीई किट्सची मदत केली आहे. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन, अभिनेता ह्रतिक रोशन सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

farhan akhtar donates ppe kits to hospitals promises rewards to fans who do the same

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com