esakal | 'ही राक्षसी वृत्ती'; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान-परिणीतीचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Farhan Akhtar Parineeti Chopra

'ही राक्षसी वृत्ती'; नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान-परिणीतीचा संताप

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

देशात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदिच्या पात्रात आढळलेल्या मृतदेहांचा विषय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी गंगा आणि इतर नद्यांमध्ये आढळल्या जाणाऱ्या मृतदेहांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अभिनेता फरहान अख्तर Farhan Akhtar आणि परिणीती चोप्राने Parineeti Chopra या प्रकरणाबद्दल ठोस निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. फरहान आणि परिणीतीने ट्विट करून यंत्रणेवर सवाल उपस्थित केले आहेत. बिहारमधील राज्य सरकारने गंगेमध्ये ७१ मृतदेह सापडल्याचे सांगितले आहे. त्यांना अशी शंका आहे की हे मृतदेह कोरोनाच्या रूग्णांचे आहेत. (Farhan Akhtar Parineeti Chopra express shock over bodies found in rivers)

फरहानने ट्विट केले, 'नदी किनारी तरंगत असलेल्या मृतदेहांची बातमी ही खूपच हृदयद्रावक आहे. आपण कोरोनाला एक ना एक दिवस नक्की हरवू. पण सध्या याविरोधातील लढ्यात यंत्रणेला आलेलं अपयश असून त्याला व्यवस्था जबाबदार आहे. तोवर सर्वांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.'

हेही वाचा : '..म्हणून मी मुलांसोबत राहत नाही'; नीतू कपूर यांनी सांगितलं कारण

फरहानबरोबरच अभिनेत्री परिणिती चोप्रानेदेखील याविषय़ी ट्विट केले आहे. परिणीतीने असं कृत्य करत असलेल्या लोकांची तुलना राक्षसांशी केली आहे. "या कोरोना साथीच्या काळात लोकांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्या नदीच्या काठावर आपण आपल्या आईला किंवा नातेवाइकांना असं पाण्यावर तरंगतांना पाहिल्यावर तुम्हाला काय वाटेल? याची कल्पनाही करता येणार नाही," अशा शब्दांत तिने राग व्यक्त केला.

परिणीती आणि फरहानसोबतच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीदेखील या प्रकरणाबद्दल निषेध व्यक्त केला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अनुपम खेर यांनी याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी सांगितले, 'जनतेने या सरकारला निवडले आहे. त्यामुळे आता सरकराने लोकांसाठी काही तरी केले पाहिजे.'

loading image
go to top