रियावर आरोप करणारे तिची माफी मागतील का ? : फरहान अख्तरचा सवाल 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 7 October 2020

रियाची सुटका करताना कोर्टाने असे सांगितलं की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”.

मुंबई - जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणा-या रियाला अखेर न्यायालयाने जामिन दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून रियावर टीका करणा-यांवर अभिनेता फरहान अख्तरने नाराजी व्यक्त केली आहे. सतत वेगवेगळ्य़ा प्रकारे रियावर टीकेची झोड उठवून तिला लक्ष्य करणा-यांना फरहानने चांगलेच सुनावले आहे.

रियाची सुटका करताना कोर्टाने असे सांगितलं की, “रियाने सुटकेनंतर दर १० दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसंच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचं असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावं”. रियाची सुटका होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान अभिनेता फरहान अख्तर याने रियाची बाजू घेत टीकाकारांवर निशाणा साधला आहे. आता तरी तुम्ही रियाची माफी मागणार का? असा सवाल त्याने केला आहे.

एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर रियाची न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला जामिन देण्यात आला आहे.  रियानं सुशांतच्या बहिणींवरही गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला होता. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला असून सुशांतला त्याच्या या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

अभिनेता फरहान अख्तरने यासगळ्या परिस्थितीवर सोशल मीडियातून टीका केली आहे. तो म्हणाला,  “रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर आरोप करणारे वृत्त निवेदक आता तरी माफी मागणार का? मला वाटत नाही ते मागतील. पण त्यांनी आता आपला विषय बदलायला हवा. तेच त्यांच्यासाठी योग्य ठरेल. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farhan Akhtar Twitter Reaction on High Court Grants Rhea Chakraborty Bail