
तेव्हा फातिमा सना शेख बरोबर जोडलं होतं आमिरचं नाव
मुंबई: सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) किरण रावपासून (kiran rao) घटस्फोट (divorce) घेत असल्याचं जाहीर केलं आहे. १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खानचं वलय, प्रतिमा लक्षात घेता आमिर खानचा घटस्फोट ही अनेकांसाठी धक्कादायक बाब आहे. आमिर खानचा हा दुसरा विवाह होता. रीना दत्तला घटस्फोट दिल्यानतंर आमिरने किरण बरोबर संसार थाटला. 'लगान'च्या (laggan) सेटवर आमिरची किरण राव बरोबर ओळख झाली. ती सहाय्यक दिग्दर्शक होती. पुढे ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. (Fatima Sana Shaikh on rumours of affair with Aamir Khan)
आमिरने किरणला घटस्फोट का दिला? त्यांच्यामध्ये नेमक काय बिनसल? आमिरच्या आयुष्यात दुसरी कोणी व्यक्ती आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्यंतरीच्या काळात आमिरच नाव दंगलमधील सहकलाकार फातिमा सना शेख बरोबर जोडलं जात होतं. त्यावेळी तिने कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
फातिमाचं नाव आमिरसोबत का जोडलं गेलं?
'दंगल' चित्रपट सुपर डूपर हिट झाला. आमिर आणि फातिमा दोघांच्या कामाचं कौतुक झालं. त्यानंतर फातिमाला विजय कृष्ण आचार्य यांच्या 'ठग ऑफ हिंदोस्तान' मध्ये काम मिळाले. आमिरच या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. तेव्हापासून आमिर आणि फातिमामध्ये जवळीक वाढल्याची चर्चा सुरु झाली.
फातिमाला जेव्हा एका मुलाखतीत या बद्दल विचारलं तेव्हा तिने, "या अशा चर्चांमुळे वाईट वाटतं. अनेक जण ज्यांना मी कधीही भेटलेही नाही. ते माझ्याबद्दल असं लिहितात. यात काही सत्य आहे का? हे सुद्धा त्यांना माहित नसते. हे वाचून लोकांना मी चांगली व्यक्ती नाही असे वाटते."
घटस्फोटावर आमिर-किरणने काय म्हटलय?
'विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे', असं त्यांनी पुढे म्हटलं.