मी पॉर्नपासून कधीच दूर गेले, पण...

वृत्तसंस्था
Tuesday, 10 September 2019

आपल्याला जीवनात खुप वाईट अनुभवांना सामाेरे जावे लागल्याचे ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत अडल्ट स्टार मिया खलिफाने सांगितले आहे. पॉर्न इंडस्ट्रीमुळेच आपल्या खासगी आयुष्याचे वाटोळे झाल्याची खंत मियाने या मुलाखतीत व्यक्त केली.

मुंबई : आपल्याला जीवनात खुप वाईट अनुभवांना सामाेरे जावे लागल्याचे ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत अडल्ट स्टार मिया खलिफाने सांगितले आहे. पॉर्न इंडस्ट्रीमुळेच आपल्या खासगी आयुष्याचे वाटोळे झाल्याची खंत मियाने या मुलाखतीत व्यक्त केली.

दरम्यान तिने अंत्यंत सविस्तरपणे आपल्याला आलेले अनुभव या मुलाखतीवेळी व्यक्त केले आहेत.  साल 2014-2017 दरम्यान मियाने जेमतेम तीन महिन्यांसाठी या इंडस्ट्रीत काम केले होते. मात्र इंडस्ट्री सोडल्यावरही पॉर्नस्टारचा ठपका आयुष्यभर पुसला जाणार नाही असे दुःख तिने व्यक्त केली.

ती म्हणते ”मी पॉर्नपासून कधीच दूर गेले. पण आयुष्यभर मला पॉर्नस्टार म्हणूनच समजलं जाईल. लोकांना वाटतं मी पॉर्न इंडस्ट्रीत कोट्यवधी रुपये कमावले. पण त्या कामातून मला फक्त आठ लाख रुपये मिळाले होते.” ही इंडस्ट्री साेडल्यानंतर खुप समस्या आपल्या समाेर आल्याचे तिने सांगितले.  

ती पुढे म्हणाली, ”मी स्वत:ला केवळ जगापासूनच नाही तर माझ्या कुटुंबीयांपासूनही दूर नेलं होतं. पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतरही मी एकटीच होती. काही चुकांसाठी कधीच माफी मिळत नाही हे मला तेव्हा समजलं होतं. पण वेळ हा सर्व जखमांवर उत्तम उपाय असतो आणि आता थोड्याफार प्रमाणात का होईना गोष्टी बदलू लागल्या आहेत. इंडस्ट्री सोडल्यानंतर मला नोकरी शोधताना बऱ्याच अडचणी आल्या. पॉर्न इंडस्ट्री सोडून काही वर्षे झाली असली तरी आजही सार्वजनिक ठिकाणी मला लोकांच्या नजरेचा प्रचंड त्रास होतो. माझ्या कपड्यांच्या आत धुंडाळणाऱ्या नजरांमुळे मला स्वत:चीच शरम वाटते. माझ्या खासगी आयुष्याचे पुरते नुकसान झाले आहे. यासाठी मी स्वत: कारणीभूत आहे. कारण अवघ्या एका गुगल सर्चवर माझे व्हिडीओ उपलब्ध होतात. यामुळे माझा खुप ताेटा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Feel like people can see through my clothes brings me deep shame says mia khalifa on porn career