Ravindhar Chandrasekaran Arrest: कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला अटक

Ravindhar Chandrasekaran Arrest:
Ravindhar Chandrasekaran Arrest: Esakal

South Movie Producer Arrest : दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी आणि तिचे पती-निर्माते रवींद्र चंद्रशेखरन हे नेहमीच चर्चेत असतात. रवींद्र चंद्रशेखरन हा साऊथचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. मात्र आता चंद्रशेखरन याच्याशी संबंधित मोठी बातमी समोर येत आली आहे. त्यामुळे चंद्रशेखरनच्या अडचणीही वाढल्या आहेत. रवींद्र चंद्रशेखरनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ravindhar Chandrasekaran Arrest:
G Marimuthu passes away: प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याच्या व्यवसायाचा प्रस्ताव देऊन त्यानी एका व्यावसायिकाची फसवणुक केली आहे. व्यावसायिकाला तब्बल 15.83 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रविंदरला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्यावसायिकाची 15.83 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखेच्या इन्स्ट्रुमेंट डॉक्युमेंट फ्रॉड ने गुरुवारी रविंदर चंद्रशेखरनला अटक केली आहे.

Ravindhar Chandrasekaran Arrest:
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा लढा पडद्यावर झळकणार; लढवय्ये मनोज जरांगेंच्या जीवनावर येणार चित्रपट

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देतांना पोलिसांनी सांगितले की, 'माडव मीडिया प्रायव्हेट लिमिटेड'चे बालाजी कापा यांनी ग्रेटर चेन्नई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की ऑक्टोबर 2020 मध्ये लिब्रा प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक ​​रविंदर चंद्रशेखरन यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

Ravindhar Chandrasekaran Arrest:
Kangana-Nausheen: मला कंगनाच्या कानाखाली मारायचीय! पाकिस्तानी अभिनेत्री इतकी का भडकली?

महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी नवीन व्यवसायाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला आणि आर्थिक मदत मागितली. त्यांनी 17 सप्टेंबर 2020 रोजी गुंतवणूक करार केला आणि 15.83 कोटी रुपये दिले. रक्कम मिळाल्यानंतर रविंदरने ऊर्जा व्यवसाय सुरू केला नाही आणि रक्कम परत केली नाही.

या तक्रारीच्या आधारे रविंदरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीएफ पुढील तपास करत आहे. या तपासादरम्यान रविंदरने बालाजी कापाकडून गुंतवणूकीचा करार करतांना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे समोर आले आहे.

(Latest Marathi News)

Ravindhar Chandrasekaran Arrest:
Jawan 2: शाहरुखचा जवान 2 येणार? थेट संजू बाबाने दिली 'या' सीन मधुन तगडी हिंट

केंद्रीय गुन्हे शाखेच्या (CCB) इन्स्ट्रुमेंट डॉक्युमेंट फ्रॉड (EDF) विंग-I ने गुरुवारी रविंदर चंद्रशेखरनला अटक केली. चित्रपट निर्मात्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com